बीजप्रक्रिया करून खरीप पेरणी करावी : आमदार आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:16+5:302021-06-23T04:16:16+5:30
हातकणंगले तालुक्यातील विविध मंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रगतशील शेतकऱ्यांना आमदार आवळे यांच्या हस्ते भुईमुग बियाणे मिनी किटचे वितरण ...
हातकणंगले तालुक्यातील विविध मंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रगतशील शेतकऱ्यांना आमदार आवळे यांच्या हस्ते भुईमुग बियाणे मिनी किटचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हे किट देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ म्हणाले, शासनाने भुईमूगच्या पिकाचे चांगले उत्पादन मिळावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. प्राथमिक टप्प्यात प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये त्याचे सर्वोत्तम परिणाम आढळले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांना याचा कटू अनुभव येतो यासाठी हे प्रमाणित बियाणे किट देण्यात आले आहे.
यावेळी वडगाव बाजार समिती सभापती चेतन चव्हाण, शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष कपिल पाटील, रणजित निकम कृषी पर्यवेक्षक सुधीर वठारे, रामचंद्र पाटील, महादेव जाधव, सुधीर सोळांकुरे, मनीषा गायकवाड आदी उपस्थित होते.
कृषी पर्यवेक्षक महादेव जाधव यांनी अभियानाची माहिती सांगितली.
फोटो ओळी - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना भुईमूग बियाणे कीटचे वितरण आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदकुमार मिसाळ, सुधीर वठारे, चेतन चव्हाण, कपिल पाटील, महादेव जाधव, सुधीर सोळांकुरे, मनीषा गायकवाड,रणजित निकम आदी उपस्थित होते.