परतीच्या पावसाने खरीप पिके आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:21 PM2017-09-29T20:21:48+5:302017-09-29T20:22:02+5:30

कोल्हापूर : परतीचा पाऊस रोज झोडपत असल्याने खरीप पिके पाण्यात आडवी झाली आहेत. भुईमूग, सोयाबीनला मोड आले असून भातपीक तर पाण्यावरच तरंगू लागल्याने शेतकरी हवालदिल

Kharip crops by returning rain fall | परतीच्या पावसाने खरीप पिके आडवी

परतीच्या पावसाने खरीप पिके आडवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : परतीचा पाऊस रोज झोडपत असल्याने खरीप पिके पाण्यात आडवी झाली आहेत. भुईमूग, सोयाबीनला मोड आले असून भातपीक तर पाण्यावरच तरंगू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पेरणी करून साडेतीन-पावणेचार महिन्यांचा कालावधी झाल्याने भुईमूग, सोयाबीन, भातपीके काढणीस आली आहेत. ज्या काळात पाऊस गरजेचा होता, त्यावेळी त्याने दडी मारली आणि आता काढणीच्या वेळी रोज पाऊस न चुकता हजेरी लावत आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने भुईमूग, सोयाबीन काढायचे कसे, असा पेच निर्माण झाला आहे. परिपक्व झालेल्या भातपिकाला पाऊस सहन होत नाही. जोराचा पाऊस झाला की, भात सरळ जमिनीवर आडवेच होते. पाण्यात दोन दिवस लोंब्या राहिल्या की तिसºया दिवसापासून मोड येण्याची प्रक्रिया सुरू होते.

शुक्रवारी दुपारी मेघगर्जनेसह दीड तास पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर शहरात पाणीच पाणी करून सोडले. शहरातील रस्त्यांना तर नेहमीप्रमाणे तळ्याचे स्वरूप आले होते. रस्त्यांवरील पाणी व पावसाच्या जोरामुळे वाहनधारकांचा वेगही मंदावल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

महिन्यात चार हजार मिलिमीटर पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी २३९१ मिलिमीटर पाऊस पडतो; पण यंदा तब्बल चार हजार मिलिमीटर (२९० टक्के) पाऊस झाला आहे. सहा तालुक्यांत सरासरीच्या २०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

मलकापूर परिसरात नुकसान
मलकापूर : मलकापूर परिसरात परतीच्या पावसाने गेले दोन थैमान घातले आहे . या पावसामुळे भात पिकांचे नुकसान होवू लागले आहे . हाता तोंडाला आलेला घास वाया जाणार का या चिंतेत बळीराजा आहे .
सकाळी ऊन दुपारी पाऊस असा खेळ निसर्गचा सुरू आहे . दुपार पर्यत वातावरण एकमद म गरम असते . कडक ऊन पडलेले असते . दुपारी दोन वाजले नतंर वातावरणात एकदम बदल होवून सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरतो . एकदम पावसाला सुरवात होते . गेली दोन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे भात पिकांचे नुकसान होवू लागले आहे .भात रताळी भूईमुग सोयाबीन आदी पिके काढणीला आली आहेत . भाताची सुगी चालू झाली आहे . पावसामुळे चालू वर्षी भाताची सुगी लांबण्याची शक्यता आहे . सतत पडत असलेल्या पावसामुळे पिके वाया जाण्याची शक्यता आहे .पाऊस उघडण्याची वाट शेतकरी पाहत आहे . पडणा?्या पावसाचा सध्या तरी बळीराजाला फायदा नसून पिकांचे नुकसान होत आहे . नवरात्रोत्सव देखील पावसातच साजरा झाला .

आवळीत वीज पडून दोन म्हशी ठार
देवाळे : आवळीसह परिसरात झालेल्या मुसळदार पावसाने आवळी (ता. पन्हाळा) येथील जगन्नाथ श्रीपती पाटील यांच्या दोन म्हशींवर वीज पडून जागीच मृत्यू झाला.जगन्नाथ पाटील आज सकाळी चारण्यासाठी घेऊन गेले होते. आज सायंकाळच्या सुमारास आवळी परिसरात विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गवत चरत असलेल्या दोन म्हशींच्या अंगावर अचानक वीज कोसळल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या. जगन्नाथ पाटील हेदेखील यामध्ये जखमी झाले आहेत. यात पाटील यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाईसाठी संबंधित अधिकाºयांनी पंचनामा करावा अशी मागणी होत आहे. पावसाने भात पिकांबरोबरच भुईमूग, ऊस, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेच्या माहितीकडे महसूल विभागाचे डोळेझाक
वीज कोसळल्यानंतर घटनेची माहिती ग्रामसेवक व तलाठी यांना देणे क्रमप्राप्त असते. ग्रामपंचायत सदस्य जयवंत कदम यांनी दूरध्वनीवरून महसूल विभागाला या घटनेबाबत सांगण्याचा प्रयत्न केला; पण निर्ढावलेल्या अधिकाºयांनी याकडे डोळेझाक केली.

वाघबीळ-माले रस्त्यावर पावसाने पाणी; दोन तास वाहतूक ठप्प

देवाळे/ वार्ताहर - पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ ते माले रस्त्यावर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी आल्याने तीन ठिकाणी सुमारे २ तास वाहतूक ठप्प झाली, तर जोतिर्लिंग पब्लिक स्कूलकडे जाणारा रस्ताच वाहून गेला.
आज दुपारी सुमारे १ तास ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाघबीळ ते माले रोड दरम्यान कोडोलकर मळ्याजवळील दोदावी ओढ्यावरील पुलाखाली नळ्यामध्ये झाडांच्या फांद्या अडकल्याने रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते. आज खंडेनवमीमुळे जोतिबा दशर्नाला जाणाºया भाविकांची संख्या जास्त होती. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने येथे वाहतुकीची मोठी गर्र्दी झाली होती. रस्त्यावर पाणी आल्याने दोन तास वाहतूक खोळंबली. रात्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माले गावातील बबलू चौगुले, प्रसाद सूर्यवंशी, राहुल वगरे, विक्रम जमदाडे यांनी ओढ्यात नळयामध्ये झाडांच्या अडकलेल्या फांद्या धाडसाने दूर केल्या. त्यानंतर काही वेळाने रस्त्यावरील पाणी कमी झाले आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली. तर सूर्यवंशी मळा, बावडेकरांची विहीर या ठिकाणी लहान-मोठ्या वघळातून आणि वतातून रास्तावर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी आले होते. माले येथिल जोतिर्लिंग पब्लिक स्कूलकडे जाणारा रस्ताच मुसळधार पावसाच्या पाण्याने वाहून गेला.
 

 

Web Title: Kharip crops by returning rain fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.