खाशाबा जाधव यांची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:46+5:302021-01-16T04:28:46+5:30
या कार्यक्रमाची सुरुवात गार्गी भट हिने योगाची प्रात्यक्षिके सादर करून केली. त्यानंतर ऑलिम्पिक निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या तेजस्विनी सावंत, ...
या कार्यक्रमाची सुरुवात गार्गी भट हिने योगाची प्रात्यक्षिके सादर करून केली. त्यानंतर ऑलिम्पिक निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वरूप उन्हाळकर व शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले आंतरराष्ट्रीय खेळाडू उज्ज्वला चव्हाण, अभिषेक जाधव, अफ्रिद अत्तार, विवेक मोरे, स्वप्निल पाटील, आरती पाटील, वैष्णवी सुतार, प्रथमेश कापडे, दत्तप्रसाद चौगले, खुशबू रिकबादर, मान्तेश पाटील, पृथ्वीराज पाटील, सूरज आसवले, कोमल देसाई, आदींचा सत्कार जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते झाला. जिल्हा क्रीडाधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन पुरस्कार विजेत्या टेबलटेनिसपटू शैलजा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव जाधव यांनी खाशाबांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर निलोफर आजगेकर, शोभाताई बोंद्रे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, बिभीषण पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १४०१२०२१-कोल-र्कीतीस्तंभ
ओळी : कोल्हापुरातील भवानी मंडपात भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी कीर्तिस्तंभास क्रीडाप्रेमींतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा क्रीडाधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू शैलजा साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.