भर पावसात पाच लोकांच्या उपस्थितीत खुदबा पठण, घरच्या घरी बकरी ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:16 PM2021-07-21T12:16:03+5:302021-07-21T12:18:14+5:30
Bakri Eid Kolhapur : त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाणारी बकरी ईद बुधवारी साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच ईद साजरी करण्यात येत आहे. सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने सर्वांनी मशिदीऐवजी घरच्या घरीच नमाज अदा केली.
कोल्हापूर : त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाणारी बकरी ईद बुधवारी साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच ईद साजरी करण्यात येत आहे. सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने सर्वांनी मशिदीऐवजी घरच्या घरीच नमाज अदा केली.
सामुदायिक नमाज पठण करता येणार नसल्याने बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुस्लिम बोर्डिंग येथे भर पावसात पाच लोकांच्या उपस्थितीतच खुदबा पठण करण्यात आले.
सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने मशिदीऐवजी घरच्या घरीच नमाज अदा करावी, असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगतर्फे करण्यात आले होते. सामुदायिक नमाज पठण करता येणार नसल्याने बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुस्लिम बोर्डिंग येथे पाच लोकांच्या उपस्थितीतच खुदबा पठण झाले.
यावेळी इतरांनी घरातूनच खुदबा पठण करून कुर्बानी करावी, असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवानी घरातूनच ईद साजरी केली.