रिल्समधील खुन्नस; संभाजीनगरात टोळी युद्धातून तरुणाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 03:44 PM2024-06-13T15:44:49+5:302024-06-13T15:45:51+5:30

सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला.  हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

Khunnas in Reels; Brutal killing of young man in gang war in Sambhajinagar | रिल्समधील खुन्नस; संभाजीनगरात टोळी युद्धातून तरुणाची निर्घृण हत्या

रिल्समधील खुन्नस; संभाजीनगरात टोळी युद्धातून तरुणाची निर्घृण हत्या

कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे (वय २०, वारे वाहतात) याचा आठ ते दहा जणांनी खून केला. मृताच्या नातेवाकांनी व मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम  सुरू आहे.

सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला.  हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

हल्ला करून संशयित पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील सुजल याला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. सुजल याच्यावर हल्ला झाल्याचे समजतात संभाजीनगर, वारे वसाहत येथील त्याचे मित्र व नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली. शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा सीपीआरमध्ये दाखल झाला.

सुजल व त्याच्या मित्रांची सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
 
Web Title: Khunnas in Reels; Brutal killing of young man in gang war in Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.