अपहरण करून म्हारूळच्या तरुणाना मारहाण, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:59 PM2019-08-03T16:59:31+5:302019-08-03T17:01:44+5:30
उसन्या घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी लिहून घेतलेले करारपत्र आणि धनादेश परत मिळविण्यासाठी म्हारूळ (ता. करवीर) येथील तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित अभिजित जालंदर देशमुख (वय ३०), सुनील रघुनाथ चवरे (३७ दोघेही रा. चाळशिरंबे, ता. कऱ्हाड , जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयितांनी रमेश संतू कांबळे (३९, रा. म्हारूळ) यांना डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.
कोल्हापूर : उसन्या घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी लिहून घेतलेले करारपत्र आणि धनादेश परत मिळविण्यासाठी म्हारूळ (ता. करवीर) येथील तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित अभिजित जालंदर देशमुख (वय ३०), सुनील रघुनाथ चवरे (३७ दोघेही रा. चाळशिरंबे, ता. कऱ्हाड , जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयितांनी रमेश संतू कांबळे (३९, रा. म्हारूळ) यांना डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.
करवीर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रमेश कांबळे यांनी एप्रिल २०१५ मध्ये संशयित अभिजित देशमुख यांचे वडील जालंदर देशमुख यांना तीन लाख रुपये उसने दिले होते. त्या वेळी कांबळे यांनी देशमुख यांच्याकडून बँकेचा धनादेश आणि करारपत्र लिहून घेतले होते. मात्र जालंदर यांनी घेतलेली रक्कम दिलेल्या मुदतीत परत केली नाही. त्यावेळी कांबळे यांनी त्यांना फोन करून तुमच्याकडून घेतलेला धनादेश बँकेत भरत आहे.
करारपत्राचा भंग केल्याने वकिलांकडून नोटीस पाठवीत असल्याचे सांगितले. संशयित अभिजित आणि सुनील यांना त्याचा राग आला. त्यांनी कांबळे यांच्याकडे धनादेश आणि करारपत्र परत मागितले. मात्र त्यांनी देण्यास नकार दिल्याने त्यांचे अपहरण करण्याचा कट रचला. जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना कुडित्रे (ता. करवीर), आष्टा, इस्लामपूर, नेर्ले येथे नेऊन एका घरात डांबून ठेवले.
त्या ठिकाणी त्यांना काठीने मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन धनादेश, टीटी फॉर्म, करारपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्या. हा प्रकार ३० जुलै ते १ आॅगस्टच्या दरम्यान घडला. अखेर त्यांच्या तावडीतून सुटून त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.