मुले पळवणारी टोळी कोल्हापुरात? सोशल मीडियावरील अफवांनी पालकांत भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 16:06 IST2022-10-18T16:05:29+5:302022-10-18T16:06:04+5:30
युवराज कवाळे कोल्हापूर : लहान मुले चोरणारी टोळी कोल्हापूरमध्ये आल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु आहे. त्यातून पालकांमध्ये भीतीचे ...

मुले पळवणारी टोळी कोल्हापुरात? सोशल मीडियावरील अफवांनी पालकांत भीती
युवराज कवाळे
कोल्हापूर : लहान मुले चोरणारी टोळी कोल्हापूरमध्ये आल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु आहे. त्यातून पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
काही दिवसांपूर्वी लहान मुलाचे अपहरण करणारी व्यक्ती पकडून लोकांनी त्या व्यक्तीस चोप देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. असाच एक व्हिडिओ ताराराणी चौक ते मार्केट यार्ड या परिसरात रस्त्यावर मूर्ती विकणाऱ्या लोकांमधील लहान मुलाचे अपहरण करताना एका व्यक्तीस पकडल्याचे व्हायरल झाले. गुरुवारी पुन्हा एक बुरखा परिधान केलेली महिला जवाहर नगरमधील एका शाळेच्या आसपास फिरत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. याव्हिडिओमुळे सध्या पालकांत चिंता असून मुलांना शाळेत पाठवताना त्यांचा जीव वरखाली होत आहे.
कुटुंबातील लोक मुलांना कुठेही एकटे जाऊ देत नाहीत अशी परिस्थिती सध्या आहे. या पूर्वी अशा घटना घडलेल्या असल्यामुळे लोक काळजी करीत आहेत.
सोशल मीडियावर लहान मुलांना अपहरण करणारी टोळी कोल्हापूरमध्ये आल्याचे व्हिडिओ पहिल्या नंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून मुलाना शाळेत ने-आण करण्यासाठी स्वतः जावे लागत आहे. - संग्राम पाटील - पालक राजारामपुरी
मुले अपहरणासंदर्भात ही अफवा असून अशी कोणतीही नोंद पोलिसांकडे नाही. नागरिकांनी मुलांची काळजी घ्यावी. काही संशयस्पद घटना निर्दशानास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. - संजय गोर्ले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग