गडमुडशिंगीतून अज्ञात मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:41+5:302021-09-02T04:53:41+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. ३१) पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. पीडित मुलगी व ...

Kidnapping of an unknown girl from Gadmudshingi | गडमुडशिंगीतून अज्ञात मुलीचे अपहरण

गडमुडशिंगीतून अज्ञात मुलीचे अपहरण

Next

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. ३१) पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. पीडित मुलगी व भावंडे घरातच होती. दरम्यान पीडित मुलगी सकाळी अकराच्या सुमारास घरातून कामानिमित्त बाहेर पडली. ती उशिरा घरी आलीच नाही. तिचे आई-वडील सायंकाळी घरी आल्यानंतर ती घरी दिसून आली नाही म्हणून त्यांनी आपल्या बाकीच्या मुलांना विचारणा केली. त्या मुलाने आम्हालाही माहीत नाही असे सांगितले. तिच्या आई-वडिलांनी व कुटुंबीयांनी पै-पाहुणे शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही. तिच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो झाला नाही. त्यामुळे घरच्यांनी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पीडित मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिचे वडील सुभाष कृष्णा गोसावी (रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल विजय मुंदाळे करीत आहे.

Web Title: Kidnapping of an unknown girl from Gadmudshingi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.