तरुणाचे अपहरण, राजेंद्रनगरमधील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 08:06 PM2020-01-10T20:06:11+5:302020-01-10T20:49:29+5:30
राजारामपुरीतून तरुणाचे अपहरण करून खिशातील पाकीट, सोन्याची चेन, अंगठ्या जबरदस्तीने काढून घेत पलायन केलेल्या दोघा आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित बिल्डर सौदागर कांबळे (वय २२), नितीन पांडुरंग घोडके (३२, दोघे रा. राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कोल्हापूर : राजारामपुरीतून तरुणाचे अपहरण करून खिशातील पाकीट, सोन्याची चेन, अंगठ्या जबरदस्तीने काढून घेत पलायन केलेल्या दोघा आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित बिल्डर सौदागर कांबळे (वय २२), नितीन पांडुरंग घोडके (३२, दोघे रा. राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पूजा सागर लोंढे (२९, रा. सिद्धी पॅलेस, राजारामपुरी, दहावी गल्ली) या घरी असताना दि. २६ आॅगस्ट २०१९ रोजी संशयित विक्रम कांबळे, बिल्डर कांबळे, नितीन घोडके, अक्षय शेनॉय, संकेत, नियाज मुजावर, सुशांत, आदी दहाजणांनी घरात घुसून पूजा यांचे दीर योगेश लोंढे यांना जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले.
वाटेत त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून खिशातील पाकीट, सोन्याची चेन, अंगठ्या काढून घेत ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होते. शुक्रवारी संशयित बिल्डर कांबळे व नितीन घोडके राजेंद्रनगर परिसरात आल्याचे समजताच पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी कारवाई केली.