मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने शिक्षक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 03:02 PM2020-01-02T15:02:29+5:302020-01-02T15:04:27+5:30
कागलच्या शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव सदाशिव पाटील (वय.५६, रा.पेठवडगाव) हे केएमटी बसला पाठीमागुन मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाले असुन बस मधील इतर सातजण गंभीर जखमीं झाले आहेत. हा अपघात पहाटे ६.४५ च्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल शेजारी झाला.
शिरोली-कोल्हापूर : कागलच्या शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव सदाशिव पाटील (वय.५६, रा.पेठवडगाव) हे केएमटी बसला पाठीमागुन मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाले असुन बस मधील इतर सातजण गंभीर जखमीं झाले आहेत. हा अपघात पहाटे ६.४५ च्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल शेजारी झाला.
या अपघातातील जखमींची नावे खालील प्रमाणे
मधुकर यादव (वय ५०,रा. कणेरीवाडी), गौरू सुतार (५४,रा.सदर बाजार), रुपा सुतार (५५, रा. मुलुंड, मुंबई), रमेश गुरव (६५, रा. मुलुंड, मुंबई), शिवराम चौधरी (२६,रा.कागल), बस चालक हंबीरराव यादव (५७, रा.वरणगे पाडळी), सतिश कुंभार (५५, रा. बापट कॅम्प) हे जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कागल शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव पाटील हे शाळेत वार्षिक क्रिडा स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ आणि स्नेह सम्मेलन असल्याने घरातुन सकाळी सहाच्या अगोदरच बाहेर पडले होते.
तावडे हॉटेल येथे कोल्हापूर कागल बस सकाळी ६.४५ वाजता आली असता पाटील बस मध्ये बसले सेवा मार्गावरून बस महामार्गावर गेली असता याच वेळी पुण्याहून बंगळूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने बसला मागून उजव्या बाजूला जोरात धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की बसचा मागील बाजूचा भाग चक्काचूर झाला आहे. या जोराच्या धडकेत पाटील बस मधुन बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. यात ते जागीच ठार झाले.तर बस मध्ये मागे बसलेले प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. सात जणांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती कळताच जखमींच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारानी सीपीआर मध्ये गर्दी केली होती. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.