कोल्हापुरात सराफाचे अपहरण करून खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:46 AM2019-04-29T00:46:03+5:302019-04-29T00:46:07+5:30
कोल्हापूर : पत्नीला फेसबुकवर फें्रड रिक्वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून सराफाचे अपहरण करून खुनी हल्ला करण्यात आला. सिद्धार्थ संतोष परमार (वय ...
कोल्हापूर : पत्नीला फेसबुकवर फें्रड रिक्वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून सराफाचे अपहरण करून खुनी हल्ला करण्यात आला. सिद्धार्थ संतोष परमार (वय २६, रा. सी वॉर्ड, गुजरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित टिन्नू ऊर्फ दिग्विजय पवार (रा. ताराबाई पार्क), त्याचा दाजी मंदार व अनोळखी दोन साथीदार यांच्यावर रविवारी गुन्हा दाखल केला. संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, सिद्धार्थ परमार यांचा गुजरी येथे सराफी व्यवसाय आहे. ते काही मित्रांसोबत शनिवारी (दि. २७) रात्री कावळा नाका परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून घरी येत असताना शिवाजी पार्क, गद्रे उद्यानाजवळ, संशयित टिन्नू पवार व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडविले. टिन्नू याने ‘माझ्या बायकोला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तू तिच्याशी का बोलतोस?’ अशी विचारणा करून सराफ सिद्धार्थ परमार यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ‘तुम्ही मध्ये पडू नका, नाहीतर तुम्हालाही सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. परमार यांना हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीवर, पायावर, हातावर जबर मारहाण केली. त्यानंतर कॉलरला धरून जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून शिवाजी पूल येथील पिकनिक पॉइंट येथे नेऊन पुन्हा मारहाण केली. त्यानंतर त्यांना तिथेच टाकून ते पसार झाले. सिद्धार्थ यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी मोबाईलवरून नातेवाइकांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना कदमवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी पार्क आणि शिवाजी पुतळा या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. संशयित राहत असलेल्या ताराबाई पार्क येथील घरामध्ये झडती घेतली असता तो साथीदारांसह पसार झाला आहे. त्याचा मोबाईलही बंद आहे. पोलीस त्याच्या शोधात असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळू, असे मोरे यांनी सांगितले. गुन्ह्यामध्ये वापरलेली कारही जप्त केली जाणार आहे.
संशयातून मारहाण : जखमीची जबाब
सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी जखमी सिध्दार्थ परमार याची रुग्णालयात जावून विचारपूस केली. यावेळी त्याने आपला मोबाईल निकम यांच्याकडे देऊन चौकशी करा, मी तशी काही फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली नसल्याचे सांगितले. संशयित टिन्नु पवार हा मित्र आहे. त्याच्या पत्नीची आणि मुलीची एकदा भेट झाली होती. त्यातून फक्त ओळख होती. संशयातून त्याने मारहाण केल्याचा जबाब दिला आहे.
जबर मारहाण
सिध्दार्थच्या हातावर, पाठिवर, पायावर संशयितांनी जबर मारहाण केली आहे. संपूर्ण अंगावर मारहाणीचे वळ उठुन सुज आली आहे. या मारहाणीमुळे त्याला ºहदयविकाराचा धक्काही आला आहे.