बालवाडी वर्गांचे प्राथमिक शाळांना संलग्नीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:20+5:302021-03-16T04:26:20+5:30
कोल्हापूर : अंगणवाडीप्रमाणे बालवाडी वर्गांचेही प्राथमिक शाळांना संलग्नीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ व ...
कोल्हापूर : अंगणवाडीप्रमाणे बालवाडी वर्गांचेही प्राथमिक शाळांना संलग्नीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ व बालवाडी शिक्षिका-सेविका महासंघाने सोमवारी केली. अप्पर मुख्य शिक्षण सचिवांनी दि. ८ मार्च २०२१ रोजी दिलेल्या आदेशात राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पूर्वप्राथमिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने शाळा आणि अंगणवाडी यांचे संलग्नीकरण करावे, असे आदेश दिले आहेत. पण, या आदेशामध्ये बालवाडी संलग्नीकरणाबाबत कोणताच उल्लेख नाही. यास्तव अंगणवाडीप्रमाणे बालवाडीवर्गांचेही प्राथमिक शाळांना संलग्नीकरण करावे, अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. त्याबाबतचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन विभाग) मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) सोमनाथ रसाळ आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना दिले. त्यांनी महासंघाची मागणी शासनाकडे पाठविली जाईल, अशी ग्वाही दिली.