Ganpati Festival -‘करवीरचा राजा’चे जल्लोषात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:37 AM2019-08-30T10:37:56+5:302019-08-30T10:40:26+5:30
पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गुरुवारी वाय. पी. पोवारनगर मित्रमंडळाच्या ‘करवीरचा राजा’ या गणेशमूर्तीचे आगमन झाले.
कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गुरुवारी वाय. पी. पोवारनगर मित्रमंडळाच्या ‘करवीरचा राजा’ या गणेशमूर्तीचे आगमन झाले.
गणेशोत्सवाला आता अवघे तीन दिवस राहिल्याने शहरातील विविध मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी बिंदू चौकात आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल चव्हाण, सचिन पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष व नगरसेवक नियाज खान उपस्थित होते.
बिंदू चौकमार्गे आझाद चौक, उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हुतात्मा पार्कमार्गे वाय. पी. पोवारनगर येथे येऊन मिरवणुकीची सांगता झाली.
ही मूर्ती मुंंबईचे मूर्तिकार कुणाल पाटील यांनी घडविली आहे. मंडळातर्फे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, जमलेल्या निधीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यकारी अध्यक्ष रविकिरण गवळी, उपाध्यक्ष विशाल देशपांडे, अमित माने, सौरभ पाटील, सिद्धार्थ पोळ, ओंकार सणगर, अभिषेक ताडे, सुशांत व्हटकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.