किणीत सुपर स्प्रेडर तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:04+5:302021-05-26T04:24:04+5:30
दुसऱ्या लाटेत किणीत पॉझिटिव्ह पेशंटाची नव्याने भर पडत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १६५ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून ...
दुसऱ्या लाटेत किणीत पॉझिटिव्ह पेशंटाची नव्याने भर पडत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १६५ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून उद्योगपती संजय पाटील यांच्या पुढाकाराने संजय पाटील फाउंडेशनच्या वतीने किणी हायस्कूलमध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. दक्षता समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाच दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता, तर सद्य:स्थितीत लॉकडाऊन असतानाही किणीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या सुपर स्पेडरची तपासणी मोहीम हाती घेतली असून, त्यानुसार किणी येथे कन्या शाळेत किराणा दुकानदार, किरकोळ भाजीपाला विक्रेते व अन्य व्यावसायिक, अशा १४५ पैकी पहिल्या टप्प्यात ८४ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.