किणीची श्रावणी देसाई महाराष्ट्र सिनियर महिला क्रिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:50+5:302021-03-18T04:23:50+5:30

श्रवणीचे जन्मगाव किणी असून वडील राजेंद्र धन्यकुमार देसाई नोकरीनिमित्त सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. श्रावणीला लहानपणापासूनच ...

Kini's Shravani Desai Maharashtra Senior Women's Cricket | किणीची श्रावणी देसाई महाराष्ट्र सिनियर महिला क्रिकेट

किणीची श्रावणी देसाई महाराष्ट्र सिनियर महिला क्रिकेट

Next

श्रवणीचे जन्मगाव किणी असून वडील राजेंद्र धन्यकुमार देसाई नोकरीनिमित्त सध्या

पुणे येथे वास्तव्यास आहेत. श्रावणीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. तिचे शिक्षण पुणे पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. आठवी ते दहावी तिने सलग तीन शालेय क्रिकेटमध्ये राष्ट्रीय

स्तरावर खेळली आहे तर कराटे व. तायक्वांदो सॉफ्टबॉलची या खेळात उज्ज्वल यश मिळविले आहे. किणी गावच्या क्रीडा परंपरेत कब्बडी, खो-खो सह विविध

स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकले पण क्रिकेटसारख्या खेळात

मिळवलेल्या प्रावीण्याबद्दल ग्रामस्थांनाही अभिमान वाटत आहे .

तिची

खेळातील आवड पाहून तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहीत करत बळ दिल. क्रिकेट हा मुलांचा खेळ त्यात ताकदीचा खेळ, मुलींना कसे जमेल असे सगळे म्हणत होते तरी

तिच्यातील आवड पाहून त्यांनी तिला बळ दिले आहे तिनेही. आजपर्यंत तिने १६

वर्षांखालील महाराष्ट्र टीममध्ये, १९ वर्षांखालील महाराष्ट्र

टीममध्ये सलग दोन वर्षे, तसेच गेल्या वर्षी १९ वर्षांखालील टीमची कॅप्टन

म्हणून खेळली होती. आता तर सिनीयर महिला टीममध्ये निवड झाली आहे. जयपूर

येथील स्पर्धेसाठी गेली आहे. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बी. कॉम.च्या

पहिल्या वर्षात शिकत आहे.

१७ श्रावणी देसाई

Web Title: Kini's Shravani Desai Maharashtra Senior Women's Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.