मंत्री हसन मुश्रीफांवर कारवाई होणार?, सोमय्या आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:50 PM2022-04-01T13:50:09+5:302022-04-01T14:17:14+5:30

सोमय्यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांच्याकडे वळवला आहे. त्यांनी ट्विट करत मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत.

Kirit Somaiya will meet Income Tax officials against Minister Hassan Mushrif | मंत्री हसन मुश्रीफांवर कारवाई होणार?, सोमय्या आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार

मंत्री हसन मुश्रीफांवर कारवाई होणार?, सोमय्या आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार

Next

कोल्हापूर : मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत पोहचल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांचा दौरा चांगलाच गाजला. यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांच्याकडे वळवला आहे. सोमय्यांनी ट्विट करत मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत. सोमय्या आज, शुक्रवारी  (दि. ०१) पुण्यात मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे यानंतर मुश्रीफांवर काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे.

सोमय्या यांनी हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम २५६ अन्वये कारवाईची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत यावर सुनावणी होणार आहे.



सोमय्या यांनी ट्विट करून आपल्या पुणे दौर्‍याविषयी माहिती दिली आहे. आपण शुक्रवारी पुण्यात जाणार असून, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटीत १५८ कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणी कागदपत्रे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



यापूर्वी सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात घोटाळ्याचे आरोप केले. तर या कारखान्याची पाहणी करण्यासाठी ते कोल्हापूरला आले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी सोमय्यांना विरोध केला होता. आज पुन्हा सोमय्यांनी मुश्रीफांच्याकडे मोर्चा वळवल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात रान उठवले आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते अनिल परब, प्रताप सरनाईक यांना घेरले आहे. यातील देशमुख आणि मलिक सध्या कोठडीत आहेत.

Web Title: Kirit Somaiya will meet Income Tax officials against Minister Hassan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.