सिंगिंग आयडॉल स्पर्धेत कीर्तीसेली नायडू, मोनाली उपरे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:43+5:302021-08-26T04:26:43+5:30

कोल्हापूर : विरासत फाैंडेशनच्यावतीने आयोजित कोल्हापूर सिंगिंग आयडॉल' स्पर्धेत लहान गटात कीर्तीसैली नायडू व मोठ्या गटात मोनाली उपरे हिने ...

Kirtiseli Naidu, Monali Upre first in Singing Idol competition | सिंगिंग आयडॉल स्पर्धेत कीर्तीसेली नायडू, मोनाली उपरे प्रथम

सिंगिंग आयडॉल स्पर्धेत कीर्तीसेली नायडू, मोनाली उपरे प्रथम

Next

कोल्हापूर : विरासत फाैंडेशनच्यावतीने आयोजित कोल्हापूर सिंगिंग आयडॉल' स्पर्धेत लहान गटात कीर्तीसैली नायडू व मोठ्या गटात मोनाली उपरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. लहान गटात गौरी शिंदे व शिरीन नदाफ यांना द्वितीय व दीक्षा सुतारला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मोठ्या गटात प्रियांका मिरजकरला द्वितीय व कपिल मेस्त्री यांना तृतीय क्रमांक मिळाला.

प्रसाद बारटक्के यांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले. स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, पुणे, गुहागर, इचलकरंजी येथून स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीपर्यंत १४ स्पर्धकांनी मजल मारली. फौंडेशनचे उपाध्यक्ष प्रसाद जमदग्नी यांनी स्पर्धेचा उद्देश सांगितला. परीक्षक म्हणून दिनेश माळी, सूरज नाईक, योगिनी खानोलकर व सरिता सुतार यांनी काम पाहिले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना ताशिलदार, सचिव गिरीश बारटक्के, खजानिस शिल्पा जोशी-पुसाळकर, सदस्य रणजित बुगले, तेजस अतिग्रे, पूजा बारटक्के, प्रेषिता पुसाळकर यांच्यासह कलाकार व रंगकर्मी उपस्थित होते.

--

नृत्यसंगम ऑनलाईन नृत्यस्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापुरातील सांस्कृतिक व सामाजिक चळवळ नव्याने सुरू व्हावी, यासाठी गोकुळअष्टमीनिमित्ताने चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशनच्यावतीने ‘नृत्यसंगम २०२१’ या ऑनलाईन नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्णाच्या गीतांवर आधारित ही स्पर्धा दुहेरी व समूह नृत्य या दोन प्रकारात होईल.

ही स्पर्धा कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीपुरती मर्यादित असून, त्यात १२ वर्षांपुढील कलाकारांना सहभागी होता येईल. या माध्यमातून गरजू कलाकारांना मदत निधी उभा करण्याचा प्रयत्न आहे. प्राथमिक व अंतिम फेरी या दोन टप्प्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी शुक्रवारपर्यंत (दि. २७) व्हिडिओ पाठवण्याची मुदत आहे. विजेता, उपविजेता यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मंगळवार पेठ येथील भालकर फौंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

Web Title: Kirtiseli Naidu, Monali Upre first in Singing Idol competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.