किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीला रवाना हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:50+5:302020-12-30T04:33:50+5:30
गेली महिनाभर दिल्लीत शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये ४४ शेतकऱ्यांनी हौतात्म पत्करले. हे अन्यायकारक ...
गेली महिनाभर दिल्लीत शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये ४४ शेतकऱ्यांनी हौतात्म पत्करले. हे अन्यायकारक कायदे रद्द करावेत, किमान हमीभाव, वीज बिल आदी मागण्यांसाठी सरकारला जागे करावे लागणार असल्याचे किसान सभेचे नामदेव गावडे यांनी सांगितले. दिल्लीतील शेतकऱ्यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातूनही राज्य किसान सभेच्यावतीने हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातूनही शेतकरी शनिवारी बिंदू चौकातून दिल्लीला निघणार आहेत. या शेतकऱ्यांसमवेत सांगली, बार्शी परभणी, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर येथील शेतकरी येणार आहेत. रविवारी (दि. ३) अमरावतीसह कोकण व खानदेशातील शेतकरी तिथे आल्यानंतर दुपारी तीन वाजता सभा होणार असल्याचे सतीशचंद्र कांबळे यानी सांगितले. यावेळी चंद्रकांत यादव, नामदेव पाटील, शंकर काटाळे, संजय पाटील, वाय. एन. पाटील, रवी जाधव, बाळू पाटील, दिलदार मुजावर, बाबा ढेरे, रमेश वडणगेकर आदी उपस्थित होते.