चुंबन घेणे पडले महागात; भोपळेंना ; सत्यजित कदम यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:45 AM2020-02-01T11:45:24+5:302020-02-01T11:47:49+5:30
दरम्यान, कदम यांनी सभागृहाला शिस्त लावणाऱ्या तत्कालीन महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना टोला लगावला आहे. ‘भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करीत असताना शिस्त लावणाºया महापौर लाटकर हा प्रकार घडला त्यावेळी हसत बसल्या होत्या. त्यांना हे शोभते का? भोपळे - देशमुख यांना शिस्तीचे धडे का दिले नाहीत?’ असे कदम यांनी विचारले आहे.
कोल्हापूर : प्रभागातील विकासकामांना निधी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करण्याकरिता महानगरपालिकेच्या भरसभेत नगरसेवकांसमोर स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांचे चुंबन घेणे ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे यांना महागात पडले. शुक्रवारी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.
गुरुवारी झालेल्या महापालिका सभेत कमलाकर भोपळे यांनी शारंगधर देशमुख यांचे चुंबन घेतले होते. महिला नगरसेवकांसमोर ही घटना घडल्यामुळे सभेचे कामकाज संपल्यानंतर त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. ही घटना निषेधार्ह असल्याच्या भावनादेखील नगरसेवकांनी व्यक्त केल्या होत्या. समाजातूनही त्याबाबत संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी भोपळे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस लागू केली. ‘आपले वर्तन अशोभनीय असून सभागृहाची प्रतिमा मलिन करणारे तसेच ताराराणी आघाडीला बदनाम करणारे आहे. त्यामुळे आपला खुलासा सात दिवसांत करावा अन्यथा आपल्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,’ असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.