केआयटी कॉलेजमधील ‘मेकॅनिकल, एनव्हायरमेंटल’च्या एनबीए मानांकनाला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:33+5:302021-08-02T04:09:33+5:30
या दोन्ही विद्या शाखांच्या एनबीए मानांकनासाठी एनबीए कडून त्रिसदस्यीय समितीने ऑगस्ट २०१८ मध्ये केआयटीला भेट देऊन या सन २०२१ ...
या दोन्ही विद्या शाखांच्या एनबीए मानांकनासाठी एनबीए कडून त्रिसदस्यीय समितीने ऑगस्ट २०१८ मध्ये केआयटीला भेट देऊन या सन २०२१ पर्यंत मानांकन दिले होते. त्यानुसार या मानांकनाची मुदत जूनमध्ये संपत होती. या मानांकनाच्या मुदतीत वाढ होण्यासाठी कॉलेजने एनबीएला अहवाल सादर केला. कॉलेजच्या अभिनव उपक्रम, कामकाजाची माहिती सादर केली. या अहवालाची पडताळणी तज्ज्ञ परीक्षकांच्याद्वारे होऊन ही मुदत वाढविण्यात आली. या प्रक्रियेमध्ये केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम. मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख समन्वयक डॉ. पी. पी. पवार आदींनी मानांकन प्रक्रियेचे काम पाहिले.
प्रतिक्रिया
महाविद्यालयाच्या सर्व अभ्यासक्रमांना मानांकन मिळाले आहे. आता एनबीए मानांकनामुळे अभ्यासक्रमांची गुणवत्ता अधोरेखित होते. त्याचा फायदा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना होईल. त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध होतील.
-डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी