राज्यस्तरीय अन्वेश्ना प्रकल्प स्पर्धेत ‘केआयटी’चा संघ द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:15+5:302021-03-19T04:21:15+5:30

या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी ४० प्रकल्पांची निवड झाली. त्यात केआयटीचे तीन प्रकल्प होते. या प्रकल्पांनी स्पर्धेतील पहिल्या पाचमधील तीन ...

KIT's team came second in the state level research project competition | राज्यस्तरीय अन्वेश्ना प्रकल्प स्पर्धेत ‘केआयटी’चा संघ द्वितीय

राज्यस्तरीय अन्वेश्ना प्रकल्प स्पर्धेत ‘केआयटी’चा संघ द्वितीय

Next

या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी ४० प्रकल्पांची निवड झाली. त्यात केआयटीचे तीन प्रकल्प होते. या प्रकल्पांनी स्पर्धेतील पहिल्या पाचमधील तीन पारितोषिके पटकावली. स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार केआयटीच्या मेकॅनिकल विभागातील ‘ऑटोनॉमस वॉटर रोव्हर’ या प्रकल्पाला मिळाला. चौथा पुरस्कार उत्पादन विभागाच्या ‘स्मार्ट लॉक’ला, तर अंतिम पाचवा पुरस्कार ‘ॲग्रो प्रॉडक्ट शेल्फ लाइफ एक्स्टेंडर’ या प्रकल्पाला मिळाला. या प्रकल्पांमध्ये सर्वेश खिरे, अर्जुन खेडेकर, सुशांत मोरे, उबेद शेख, ओमकार वरणे या अभियांत्रिकी, तर प्रायव्हेट हायस्कूलमधील प्रथमेश टिकले, वर्देश नार्वेकर, विद्यामंदिर कणेरीवाडी येथील प्रणव पाटील, हर्षद पाटील, यशवंतराव भाऊराव पाटील या शाळेतील प्रथमेश पाटील, आदित्य कोष्टी यांचा सहभाग होता. या प्रकल्पांसाठी त्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पांचे प्रा. मिहीर कुलकर्णी, अमित वैद्य मार्गदर्शक होते. त्यांना विभागप्रमुख डॉ. उदय भापकर, केआयटीचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिंन्नी, अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो (१८०३२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : राज्यस्तरीय अन्वेश्ना प्रकल्प स्पर्धेतील द्वितीय पुरस्कारप्राप्त ‘ऑटोनॉमस वॉटर रोवर’ हा प्रकल्प सर्वेश खिरे, अर्जुन खेडेकर, प्रथमेश टिकले, वर्देश नार्वेकर या विद्यार्थ्यांनी सादर केला.

Web Title: KIT's team came second in the state level research project competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.