राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धेत ‘केआयटीच्या ‘टीम ओझाकी’ला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 04:56 PM2019-08-27T16:56:03+5:302019-08-27T16:57:22+5:30
हिंदुस्थान मोटार स्पोर्टस्ने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे आयोजित केलेल्या इंडियन सुपर कार्टिंग सीरिज-२ या स्पर्धेत कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (स्वायत्त, केआयटी) ‘टीम ओझाकी’ने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत या टीमने आॅटोक्रॉस आणि एंड्युरन्समध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला. ‘बेस्ट ड्रायव्हर’ म्हणून दीपराज राठोड याला गौरविण्यात आले.
कोल्हापूर : हिंदुस्थान मोटार स्पोर्टस्ने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे आयोजित केलेल्या इंडियन सुपर कार्टिंग सीरिज-२ या स्पर्धेत कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (स्वायत्त, केआयटी) ‘टीम ओझाकी’ने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत या टीमने आॅटोक्रॉस आणि एंड्युरन्समध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला. ‘बेस्ट ड्रायव्हर’ म्हणून दीपराज राठोड याला गौरविण्यात आले.
पुणे येथे झील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या झील ड्रॅग ३.० या स्पर्धेत ड्रॅगरेस व स्किडपॅडमध्ये या टीमने विजेतेपद पटकाविले. आॅटोक्रॉस व टग आॅफ वॉरमध्ये टीमने द्वितीय क्रमांक पटकाविला.
विजेत्या संघात दीपराज राठोड, मंथन शेवाळे, विराज पाटील, ऋतुराज संकपाळ, कपिल पवार, पार्थ पिसे, किशोर शिरसाट, करण पाटील, अश्वमेध पाटील, सचिन सुतार, अखिलेश साळोखे, अभय कोरे, सुयोग सुतार, अनिकेत कमळकर, पवन थोरात, पराग कांबळे या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या संघाला संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, डीन अकॅडमिक डॉ. एम. एस. चव्हाण, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. यू. एस. भापकर, प्रा. ए. एम. कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले.