कोल्हापुरात शिरोली नाक्यावर केएमटी बस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:51 PM2023-03-23T22:51:48+5:302023-03-23T22:51:55+5:30

३० प्रवासी बचावले, शॉर्ट सर्किटने घडली घटना

KMT bus burnt down at Shiroli station in Kolhapur | कोल्हापुरात शिरोली नाक्यावर केएमटी बस जळून खाक

कोल्हापुरात शिरोली नाक्यावर केएमटी बस जळून खाक

googlenewsNext

उद्धव गोडसे, कोल्हापूर : बोंद्रेनगर ते कागल मार्गावरील केएमटीच्या बसला शिरोली नाक्यावर मुस्कान लॉनजवळ अचानक आग लागली. गुरुवारी (दि. २३) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागताच ३० प्रवाशांसह चालक, वाहन बसमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

याबाबत अधिक माहिती अशी की, केएमटीची बोंद्रेनगर ते कागल ही बस (एमएच ०९ सीव्ही ४७९) गुरुवारी सायंकाळी मुस्कान लॉनजवळ पोहोचताच गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. गाडीतील बिघाड लक्षात येताच चालक राजकुमार गोंधळी यांनी बस रस्त्याकडेला थांबवली. त्यानंतर चालक आणि वाहक गजानन गुरव यांनी तातडीने बसमधील ३० प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच इंजिनमध्ये आग लागली. नागरिकांनी अग्निशामक दलास घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात जवानांना यश आले. 

अग्निशामक दलाचे नवनाथ साबळे, प्रमोद मोरे, आकाश जाधव, रघू साठे, पुंडलिक पोवार, कपिल यादव यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आग विझविण्याचे काम केले. चालकाने वेळीच बस थांबविल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: KMT bus burnt down at Shiroli station in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.