कोल्हापूरात दुसºया दिवशी केएमटी बससेवा बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 05:35 PM2017-10-02T17:35:45+5:302017-10-02T17:42:28+5:30

पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर घडलेल्या बस दुर्घटनेनंतर कोल्हापूरात दुसºया दिवशी सोमवारी केएमटी बससेवा बंद ठेवण्यात आली. नागरिकांच्या असंतोषापुढे बसेसचे नुकसान होऊ नये, अगर कर्मचाºयांना मारहाणीच्या घटना घडू नयेत, यासाठी हा बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

KMT bus service is closed on second day in Kolhapur! | कोल्हापूरात दुसºया दिवशी केएमटी बससेवा बंदच !

पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर घडलेल्या बस दुर्घटनेनंतर दुसºया दिवशी सोमवारी केएमटी बससेवा बंद ठेवण्यात आली.

googlenewsNext
ठळक मुद्देबस दुर्घटनेचा परिणाम बसेस सुरू करण्याचा डाव उधळलाकेएमटी प्रशासनास नऊ लाखांचा फटकाविनापरवाना प्रवाशी वाहतूक (वडाप) करणाºया व्यवसायिकांची चंगळ

कोल्हापूर : पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर घडलेल्या बस दुर्घटनेनंतर दुसºया दिवशी सोमवारी केएमटी बससेवा बंद ठेवण्यात आली. नागरिकांच्या असंतोषापुढे बसेसचे नुकसान होऊ नये, अगर कर्मचाºयांना मारहाणीच्या घटना घडू नयेत, यासाठी हा बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

वातावरणातील तणाव कमी झाल्याने प्रशासन आणि कर्मचारी यांच्या चर्चेनंतर ही बससेवा दुपारपासून सुरू करण्याचा प्रयत्नही संतप्त नागरिकांनी हाणून पाडल्याने दिवसभर बसच्या फेºया बंद ठेवण्यात आल्या.


पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर रविवारी रात्री भरधाव केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने दोनजण चिरडले गेले, तर १८ जण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे संतप्त जमावाने अपघातग्रस्त बसवर दगडफेक करून ती फोडली, तसेच पेटविली. त्यावेळी बस विझविण्यासाठी आलेल्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या, तसेच एक एसटी बसही फोडण्यात आली.

या संतप्त झालेल्या जमावाच्या हल्ल्यात एक महिला पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचा चालक आणि दसरा चौकात फोडलेल्या एसटी बसचा चालक हे तिघेही जखमी झाले. त्यामुळे घटनेनंतर तातडीने इतर बसेसवरही दगडफेक होऊ नये म्हणून ही सेवा बंद ठेवण्यात आली.


दरम्यान, सोमवारी सकाळी सात वाजता परिवहन समिती सभापती नियाज खान हे केएमटीच्या शास्त्रीनगर येथील कार्यशाळेत आले. त्यांनी केएमटी बस सेवा सुरू करावी, असे सांगितले; पण पुन्हा हल्ला होण्याच्या भीतीने चालकांनी सेवा सुरू करण्यास नकार दिला.

त्यानंतर महापौर हसिना फरास, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, ‘स्थायी’ सभापती डॉ. संदीप नेजदार, ‘परिवहन’ सभापती नियाज खान यांनी केएमटीचे कर्मचारी व अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चार बसेस बुद्धगार्डन कार्यशाळेतून निघाल्या; पण पुढील १० मिनिटांतच ही बस (एमएच०९ एएल ९८०२) दसरा चौकात आली असता, काही संतप्त नागरिकांनी ती बस अडविली.

बससेवा सुरू केल्यास पुन्हा नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागेल, त्यामुळे ही सेवा बंद करावी, असा इशारा त्या नागरिकांनी बसचालक पी. एस. हळदे यांना दिल्यानंतर चालकाने बस कार्यशाळेत परत आणली. तसेच बाहेर पडलेल्या इतर तिन्हीही बसेस पुन्हा माघारी बोलावून ही सेवा दिवसभरांसाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे सर्व कर्मचारी कार्यशाळेत दिवसभर बसून राहिले.

नऊ लाखांचा फटका

सोमवारी दिवसभर केएमटी सेवा बंद राहिल्यामुळे केएमटी प्रशासनास सुमारे नऊ लाख रुपये उत्पन्नाचा फटका बसला. बंद दरम्यान, केएमटीची चाकेच फिरली नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. तसेच विनापरवाना प्रवाशी वाहतूक (वडाप) करणाºया व्यवसायिकांची मात्र चांगलीच चंगळ झाली.

Web Title: KMT bus service is closed on second day in Kolhapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.