केएमटीला प्रशासन, कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 02:40 PM2021-01-30T14:40:36+5:302021-01-30T14:43:45+5:30
Muncipal Corporation Mla Kolhapur- प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे केएमटीला फटका बसत आहे, अशा शब्दात आमदार चंद्रकांत जाधव यांनी सुनावले. दर पगारावेळी महापालिकेवर आवलंबून राहू नका, एप्रिलपासून केएमटी स्वावलंबी करा, असे आदेशही त्यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी महापालिकेच्या केएमटी वर्कशॉपमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रशासक कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थित होती.
कोल्हापूर : प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे केएमटीला फटका बसत आहे, अशा शब्दात आमदार चंद्रकांत जाधव यांनी सुनावले. दर पगारावेळी महापालिकेवर आवलंबून राहू नका, एप्रिलपासून केएमटी स्वावलंबी करा, असे आदेशही त्यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी महापालिकेच्या केएमटी वर्कशॉपमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रशासक कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थित होती.
आमदार जाधव म्हणाले, केएमटीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी दरवेळी महापालिकेवर अवलंबून रहावे लागते, ही खेदाची बाब आहे. केएमटीचा येणारा सर्व खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातूनच भागला पाहिजे. केएमटीने यासाठी उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. काही बस रिकाम्याच जाताना दिसतात.
यासाठी तोट्यातील मार्ग बंद केले पाहिजेत. काही बसेसच्या वेळेत बदल केले पाहिजेत. पर्यटकांसाठी विशेष बससेवा सुरू करा. यावेळी माजी स्थायी सभापती सचिन पाटील, गटनेता शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक विनायक फाळके, अनिल कदम, उपायुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे आदी उपस्थित होते.
कचऱ्यापासून गॅस करून केएमटीसाठी वापरा
केएमटीच्या सर्व बसेस सीएनजी गॅसवर केल्यास तोटा कमी होऊन फायदा होईल. शहरातील कचय्रांवर प्रक्रिया करुन सीएनजी गॅस निर्मिती करून त्याचा वापर केएमटीसाठी करणे शक्य आहे. प्रशासनाने यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जाधव यांनी केली.
फोटो : २९०१२०२१ आमदार जाधव न्यूज