केएमटीचा बे्रक डाउन : चारचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 08:06 PM2020-01-21T20:06:34+5:302020-01-21T20:07:27+5:30

केएमटीमध्ये ११ वर्षांपूर्वीच्या ३0 पेक्षा जास्त बस आहेत. मुदतबा' बसेस रस्त्यावर आणल्या जात आहेत. वारंवार बिघाड होत असून, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी पापाची तिकटी येथे केएमटी बे्रक डाउनमुळे झालेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू, तर २५ पेक्षा जास्त जखमी झाले होते.

KMT's Break Down: Four-wheel drive | केएमटीचा बे्रक डाउन : चारचाकीला धडक

केएमटीचा बे्रक डाउन : चारचाकीला धडक

Next

कोल्हापूर : महाराणा प्रताप चौक येथून रुकडीकडे जाणाऱ्या केएमटी बसचा बे्रक डाउन झाल्याने समोरील चार चाकीला जोराची धडक बसली. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही; मात्र केएमटी प्रशासनाविरोधात परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

 

केएमटीमध्ये ११ वर्षांपूर्वीच्या ३0 पेक्षा जास्त बस आहेत. मुदतबा' बसेस रस्त्यावर आणल्या जात आहेत. वारंवार बिघाड होत असून, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी पापाची तिकटी येथे केएमटी बे्रक डाउनमुळे झालेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू, तर २५ पेक्षा जास्त जखमी झाले होते. यानंतरही केएमटी प्रशासनाकडून कालबा' बसेसचा वापर सुरूच ठेवला आहे.

महाराणा प्रताप चौक येथील बसस्थानकातून गांधीनगर, रुकडी या परिसरात बसेस मार्गस्थ होत्या. मंगळवारी येथून रुकडीकडे जाण्यासाठी निघालेल्या बसचा बे्रक डाउन झाला. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असणाºया चारचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये तसेच चारचाकीमध्ये कोणीही नसल्याने कोणीही जखमी झाले नाहीत; मात्र महाराणा प्रताप चौक परिसरातील नागरिकांनी केएमटी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. काहीकाळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. तडजोडीनंतर वादावर पडला.
 

 

Web Title: KMT's Break Down: Four-wheel drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.