कोजिमाशी पतसंस्था संकटकाळातही सभासदांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:19+5:302021-03-08T04:23:19+5:30

गडहिंग्लज : सभासदांना दिवाळी भेट, कन्यारत्न ठेव, सेवानिवृत्तांचा सत्कार व मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करणारी कोजिमाशी ही देशातील ...

Kojimashi Patsanstha backs its members even in times of crisis | कोजिमाशी पतसंस्था संकटकाळातही सभासदांच्या पाठीशी

कोजिमाशी पतसंस्था संकटकाळातही सभासदांच्या पाठीशी

googlenewsNext

गडहिंग्लज :

सभासदांना दिवाळी भेट, कन्यारत्न ठेव, सेवानिवृत्तांचा सत्कार व मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करणारी कोजिमाशी ही देशातील सर्वोत्तम पतसंस्था असल्याचे प्रतिपादन संस्थेचे तज्ज्ञ संचालक व शिक्षक दादा लाड यांनी केले.

कोरोनातून बरे झालेल्या सभासदांना पाच हजारांच्या धनादेशाचे वाटप करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. चे उपाध्यक्ष सतीश पाटील होते.

लाड म्हणाले, २००४ मध्ये संस्था ताब्यात आली तेव्हा ३२ कोटींच्या ठेवी होत्या तर साडेआठ टक्के थकबाकी होती. आज, ४५० कोटींच्या ठेवी असून मयत सभासदांची साडेसात कोटींची कर्जे माफ केली. बिगर कर्जदार सभासदांना ठेवींच्या पंचवीस पट रक्कम दिली आहे.

महापुरासारख्या नैसर्गिक संकटातही संस्थेने आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत दिली आहे.

कार्यक्रमास बबन काटकर, विनोद पाटील, अरविंद बारदेस्कर, अनिल कुराडे, एकनाथ देसाई, सुनील देसाई, संजय देसाई, सचिन शिंदे, रफिक पटेल, संजय भांदुगरे आदींसह संचालक सभासद उपस्थित होते.

कैलास सुतार यांनी स्वागत केले. उत्तम कवडे यांनी आभार मानले.

------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे 'कोजिमाशी' पतसंस्थेतर्फे कोरोनातून बरे झालेल्या सभासदांना तज्ज्ञ संचालक व शिक्षक दादा लाड यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, बबन काटकर आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०७०३२०२१-गड-०२

Web Title: Kojimashi Patsanstha backs its members even in times of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.