कोलेकरांनी नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:17+5:302021-04-09T04:25:17+5:30
नेसरी : गडहिंग्लजचे माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकरांनी अनेक जनआंदोलने, मोर्चे, उपोषणे यशस्वी करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले. ...
नेसरी :
गडहिंग्लजचे माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकरांनी अनेक जनआंदोलने, मोर्चे, उपोषणे यशस्वी करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले. कधीही विचार व तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांनी नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला, असे प्रतिपादन माजी प्राचार्य एस. एस. मटकर यांनी केले.
येथील शिक्षण समिती, कसबा नेसरी संचलित शिक्षण समिती परिवारातर्फे संस्थाध्यक्ष माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकर यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित चिंतन सभेत ते बोलत होते. संस्थाध्यक्ष अॅड. हेमंत कोलेकर अध्यक्षस्थानी होते.
मटकर म्हणाले, स्व. कोलेकरांचा स्वभाव साधा, प्रेमळ होता. गोरगरीब जनतेवर अन्याय झाला की पेटून उठत, प्रसंगी न्याय हक्कासाठी स्वत: जाऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत. सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याला ते नेहमी धारेवर धरीत.
यावेळी संचालक विठ्ठल सूर्यवंशी, जानबा कालकुंद्रीकर, युवराज पाटील, डॉ. अर्चना कोलेकर, सचिव विजय नाईक, महादेव साखरे, प्र. प्राचार्य संभाजी भांबर, प्राचार्य आप्पासाहेब मटकर, मुख्याध्यापक ए. डी. लोहार, उपप्राचार्य आय. टी. नाईक, डॉ. विजय मुसाई, के. जी. कातकर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
माधव भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. आर. दिवेकर यांनी आभार मानले.
----------------
फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे तुकाराम कोलेकर यांच्या फोटोपूजनप्रसंगी अॅड. हेमंत कोलेकर, एस. एस. मटकर, महादेव साखरे, युवराज पाटील, जानबा कालकुंद्रीकर, विठ्ठल सूर्यवंशी, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०८०४२०२१-गड-०३