कोळेकर कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरू

By admin | Published: February 28, 2017 12:56 AM2017-02-28T00:56:36+5:302017-02-28T00:56:36+5:30

मंडलिकांकडून मुलांचा शैक्षणिक खर्च : समरजित घाटगे, धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत

Kolekar family's help started | कोळेकर कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरू

कोळेकर कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरू

Next

मंडलिकांकडून मुलांचा शैक्षणिक खर्च : समरजित घाटगे, धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत
मुरगूड : येथील बाजारपेठेत गुरुवारी मध्यरात्री कोळेकर कापड दुकान व राहत्या घरास आग लागून धनंजय व प्रियांका कोळेकर या पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यांची मुले रोहित व ज्ञानेश्वरी आणि त्यांच्या आजी-आजोबांचे सांत्वन करण्यासाठी सोमवारी विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी पन्नास हजारांची तातडीची मदत जाहीर केली आहे.
शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पन्नास हजारांची मदत, तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी रोहित आणि ज्ञानेश्वरीच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. समाजातील सर्व थरांतून कोळेकर, मडिलगेकर व रानमाळे कुटुंबीयांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
रोहितने शिक्षण घेतानाच आपला व्यवसायही सांभाळावा, यासाठी त्यांचे दुकान उभे करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू, असे आश्वासनही यावेळी धनंजय महाडिक यांनी दिले असून, पंतप्रधान सहायता योजनेतून जास्तीत जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर समरजित घाटगे यांनीही आपण तातडीने पन्नास हजार रुपयांची मदत देत असल्याचे सांगून कोळेकर यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. प्रा. संजय मंडलिक यांनी शिक्षणाचा खर्च आपण उचलत असल्याचे सांगून कोळेकर यांचे घर बांधताना लागेल ती मदत करण्याचे अभिवचन दिले. यावेळी स्मरजित यांच्याबरोबर नवोदिता घाटगे, दत्तामामा खराडे, सुनील सूर्यवंशी, विलास गुरव, अमर चौगले, रामभाऊ खराडे, सुहास मोरे, विष्णू मोरबाळे, तर महाडिकांसोबत संदीप भारमल, दिग्विजय पाटील, प्रा. चंद्रकांत जाधव, बटू जाधव, राजू चव्हाण, विनायक भोसले, सतीश लोंढे, शशांक चौगले, रणजित भारमल, राहुल वंडकर, राजू आमते, तर मंडलिकांसोबत वीरेंद्र मंडलिक, नगराध्यक्ष राजेखान जमादार, जयसिंग भोसले, नामदेवराव मेंडके, आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)


या मान्यवरांनी केली मदत
साई मंडळ, ओंकार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून फिरून मदत गोळा केली. त्यामध्ये नगराध्यक्ष राजेखान जमादार ११ हजार, माजी नगरसेवक सुहास खराडे ११ हजार, नगरसेवक नामदेवराव मेंडके ५ हजार, विनय कुलकर्णी ५ हजार, बाळासाहेब सूर्यवंशी ५ हजार, समीर हळदकर ५ हजार, प्रवीण सूर्यवंशी ५ हजार, उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले ५ हजार, बाळूमामा भिशी मंडळ ५ हजार, नवमहाराष्ट्र मंडळ ५० हजार, ओंकार मंडळ २५ हजार, सुपरहिट मंडळ २५ हजार, व्यापारी असोसिएशन १० हजार, शाहू पतसंस्था ५ हजार, गणेश पतसंस्था ५ हजार, व्यापारी पतसंस्था ५ हजार, लक्ष्मी नारायण पतसंस्था ५ हजाराची मदत केली.
याबरोबरच साईबाबा मंडळ व वादळ ग्रुप घराच्या बांधकामासाठी लागणारे दीड लाखांचे वीट वाळू हे साहित्य, इमारतीसाठी फॅब्रिकेशन, रुफकामासाठी अनिल मगदूम, प्रवीण दाभोळे यांनी जबाबदारी घेतली आहे. वायरिंगसाठी विजय सापळे यांनी, संसारोपयोगी साहित्य जोतिराम सूर्यवंशी यांनी तर अपंग असोसिएशनने किराणा साहित्य देण्याचे सांगितले.

Web Title: Kolekar family's help started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.