कोल्हापूर : विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर ‘१०० टक्के मतदान’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:38 PM2019-01-09T12:38:18+5:302019-01-09T12:41:01+5:30
देशात युवा पिढी आजही मतदान करण्यासाठी दुर्लक्ष करते, त्यांना मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून देऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘१०० टक्के मतदान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : देशात युवा पिढी आजही मतदान करण्यासाठी दुर्लक्ष करते, त्यांना मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून देऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘१०० टक्के मतदान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चौहान म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नुकतेच ६४ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. यामध्ये युवा पिढीला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील माओवादी प्रसार कमी करणे, महिलांच्या सन्मानासाठी अभियान राबविणे यासह शैक्षणिक पद्धतीमधील पद्धत बंद करणे या विषयावर चर्चा झाली.
पहिल्या टप्प्यांमध्ये युवकांमध्ये मतदानाचे महत्त्व, मतदान नावनोंदणीसाठी फेब्रुवारीमध्ये १ ते १५ तारखेपर्यंत सर्व शहरात, ग्रामीण भागातील महाविद्यालयांत जाऊन जनजागृती केली जाणार आहे. प्रांत सहमंत्री प्रवीण जाधव, साधना वैराळे, कोल्हापूर महानगरमंत्री सौरभ कुऱ्हाडे, आदी उपस्थित होते.