कोल्हापूर : प्रादेशिक विकास आराखड्याबाबत आणखी १५०० हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:13 PM2018-08-02T12:13:39+5:302018-08-02T12:30:54+5:30

कोल्हापूर जिल्ह्याच्या सुधारित प्रादेशिक योजनेबाबत ३१ जुलैअखेर १५००  हरकती दाखल झाल्या आहेत. याआधीही या योजनेबाबत सुमारे पाच हजारांहून अधिक सूचना व हरकतींबाबत सुनावणी घेण्यात आली होती; पण ज्या तक्रारी अगर हरकतींचे योग्य निराकरण झाले नाही, अशा नागरिकांना पुन्हा बाजू मांडण्याची संधी शासनाने दिली होती.

Kolhapur: 1500 objections to the regional development plan | कोल्हापूर : प्रादेशिक विकास आराखड्याबाबत आणखी १५०० हरकती

कोल्हापूर : प्रादेशिक विकास आराखड्याबाबत आणखी १५०० हरकती

googlenewsNext
ठळक मुद्देप्रादेशिक विकास आराखड्याबाबत आणखी १५00 हरकतीनागरिकांना पुन्हा बाजू मांडण्याची संधी

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सुधारित प्रादेशिक योजनेबाबत ३१ जुलैअखेर १५००  हरकती दाखल झाल्या आहेत.
याआधीही या योजनेबाबत सुमारे पाच हजारांहून अधिक सूचना व हरकतींबाबत सुनावणी घेण्यात आली होती; पण ज्या तक्रारी अगर हरकतींचे योग्य निराकरण झाले नाही, अशा नागरिकांना पुन्हा बाजू मांडण्याची संधी शासनाने दिली होती.

ज्या हरकतदारांनी पूर्वी प्रादेशिक योजना कार्यालयात हरकती अगर सूचना दाखल केली असेल व त्यात त्यांनी नमूद केलेली सूचना शासनाने अमान्य केली आहे. अशाच हरकतदार व सूचनाधारकांनी नव्याने अर्ज करायचे असल्याचे जाहीर प्रकटन त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष शिवराज पाटील केले आहे. याला अनुसरून या १५00 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

यानंतर आता येत्या १५ दिवसांमध्ये अध्यक्ष शिवराज पाटील, सहा. संचालक नगररचना धनंजय खोत आणि वाय. एस. कुलकर्णी यांच्या त्रिसदस्यीय समितीपुढे या हरकती मांडल्या जाणार आहेत. त्यानंतर याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे.
 

 

Web Title: Kolhapur: 1500 objections to the regional development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.