कोल्हापूर : ‘केआयटी’तील पासपोर्ट शिबीरात १६७४ जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:58 PM2018-10-19T15:58:24+5:302018-10-19T15:59:56+5:30
पुणे येथील विभागीय प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘फास्टपोर्ट-फॅकल्टी, स्टुडंन्टस, स्टाफ विथ पासपोर्ट’ याउपक्रमांतर्गत केआयटीमध्ये पासपोर्ट नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. त्यात १६७४ विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
कोल्हापूर : पुणे येथील विभागीय प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘फास्टपोर्ट-फॅकल्टी, स्टुडंन्टस, स्टाफ विथ पासपोर्ट’ याउपक्रमांतर्गत केआयटीमध्ये पासपोर्ट नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. त्यात १६७४ विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
याशिबिराचे उदघाटन मंगळवारी (दि. १६) केआयटीचे उपाध्यक्ष सुनिल कुलकर्णी, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जीवन शिंदे, माजी विद्यार्थी विनायक पाचलग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपाध्यक्ष कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडे पासपोर्ट असणे किती महत्वाचे आहे, याबद्दलचे मत व्यक्त केले.
डॉ. कार्जीन्नी यांनी पासपोर्ट नोंदणी वेळी त्यांना आलेले काही अनुभव सांगितले. त्यांच्या पासपोर्ट नोंदणीचे काम सुरु आहे. या शिबिराच्या आयोजनास पुणे येथील विभागीय प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अनंत ताकवले, प्रोटोकॉल इनचार्ज जतीन पोटे, केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, सचिव दिपक चौगुले, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे आयोजन डॉ. अक्षय थोरवत, रोट्रॅक्ट क्लब आॅफ केआयटी सनशाईनचे समन्वयक डॉ. संदीप देसाई, विद्यार्थी अध्यक्ष सनत चेन्दवणकर, आदींनी केले.
ज्ञानेश्वर मुळे यांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी पासपोर्ट नोंदणीचे महत्व सांगितले. या शिबिरात एकूण १६७४ हुन अधिक विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. शिबीराचा तीन हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.