कोल्हापूर : वारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:46 PM2018-10-29T12:46:02+5:302018-10-29T12:47:44+5:30

पेठवडगाव येथील वारणा बझार च्या डिपार्टमेंट स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 20 लाखांची चोरी झाली. नेमके चोरट्यांनी कुठून प्रवेश व बाहेर कसे गेले याबाबत माहिती समजू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसयंत्रणा चक्रावली आहे.

Kolhapur: 20 lakhs stolen by breaking a safe in Varanha Bazaar | कोल्हापूर : वारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी

कोल्हापूर : वारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी

Next
ठळक मुद्देवारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी पोलिसयंत्रणा चक्रावली

पेठवडगाव : येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 20 लाखांची चोरी झाली. नेमके चोरट्यांनी कुठून प्रवेश व बाहेर कसे गेले याबाबत माहिती समजू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसयंत्रणा चक्रावली आहे.

येथे वडगाव-लाटवडे रस्त्या वर वारणा बझारचे डिपार्टमेंट स्टोअर्स आहे येथे इस्लामपूर ते किणी, खोची, दानोळी आदी शाखेची रक्कम येथे रविवारी रात्री ठेवण्यात येते. ही रक्कम सुमारे 22 लाख इतकी होती. या शाखेच्या संरक्षणासाठी सुमारे तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.



दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुसर्या मजल्यावर असणार्यानी तिजोरी कटर, कटावणीच्या सहाय्याने उचकटली. यामध्ये सुमारे 20 लाख रूपये चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर याच शाखेत अन्यत्र ठेवलेली 20 लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.त्यामुळे मोठा अर्नथ टळला.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस उपनिरीक्षक आसमा मुल्ला, विकास माने,बालाजी घोळवे, दादा माने, संदीप गायकवाड, रणवीर जाधव, नंदकुमार घुगंरे, विशाल हुबाले आदींनी धाव घेतली. घटनास्थळी ठसे तज्ञ्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक ए बी पुणेकर यांना एक ठिकाणी ठसा मिळाला आहे.

चौरट्यानी जाताना सीसीटीव्हीत टिव्ही चा डीव्हीआर घेऊन गेले आहेत. तसेच हे चोरटे माहितगार व शिक्षित असावेत असा पोलिसांचा कयास आहे.

Web Title: Kolhapur: 20 lakhs stolen by breaking a safe in Varanha Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.