कोल्हापूर : लक्ष्मीकांत देशमुख यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:10 IST2018-01-27T18:05:07+5:302018-01-27T18:10:42+5:30
कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख यांची ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक अनुराधा भोसले व गिरीश फोंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : लक्ष्मीकांत देशमुख यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्कार
कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख यांची ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक अनुराधा भोसले व गिरीश फोंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. देशमुख यांनी कोल्हापूर मध्ये जिल्हाधिकारी पदावर काम करत असताना कला, साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आदी चळवळीला मदत केली. राजर्षि शाहूंच्या विचारांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांचे कोल्हापूरसाठीचे योगदान मोठे आहे.
ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख नागरी सत्कार समारंभ समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवनात ज्येष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते, ज्येष्ठ साहित्यीक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या अध्यक्षतेखाली व शाहू छत्रपती, महापौर स्वाती यवलूजे यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार होणार आहे.
या सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन अनुराधा भोसले व गरीश फोंडे यांनी केले. यावेळी यशवंत भालकर, डॉ. जी. पी. माळी, रजनी हिरळीकर, सुनील माने, रमेश वडणगेकर, युवराज कदम आदी उपस्थित होते.