कोल्हापूर :महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे स्मशानभूमीस ५० हजार शेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:32 PM2018-12-15T17:32:43+5:302018-12-15T17:33:09+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शनिवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने ५० हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या शेणींचा स्वीकार केला.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शनिवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने ५० हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या शेणींचा स्वीकार केला.
महापालिका कर्मचाऱ्यांकडून गेली सहा वर्षे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रथम १० हजार शेणी, दुसऱ्या वर्षी २० हजार शेणी, तिसऱ्या वर्षी ३० हजार, फायर एक्स्टिंग्युशर तसेच भिंतीवरील मोठे घड्याळ व चौथ्या वर्षी ३० हजार शेणी, पाचव्या वर्षी ४० हजार व या वर्षी ५० हजार शेणी प्रदान करण्यात आल्या.
यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.