कोल्हापूर : दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:34 PM2018-08-14T18:34:41+5:302018-08-14T18:36:53+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलविसर्ग वाढला असून, दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Kolhapur: 7500 thousand cubic feet of cow dung disappeared from the milkgong | कोल्हापूर : दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरला

कोल्हापूर : दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरला

Next
ठळक मुद्दे दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरलापण रिपरिप कायम : पंचगंगा ३२ फुटांवर

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलविसर्ग वाढला असून, दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा ३२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पसरले असून, पंचगंगेचे पाणीही काठावरील शिवारांत शिरले आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस थोडा कमी झाला असला तरी दिवसभरात अधूनमधून रिपरिप कायम राहिली आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे.

धरणक्षेत्रातही सरासरी ८५ मिलिमीटर पाऊस झाल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ४४५६, ‘वारणा’तून ६०८८, तर दूधगंगा धरणातून तब्बल ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या जलपातळीत झपाट्याने वाढ होत असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ३२.५५ मिलिमीटर पाऊस झाला. यावेळी पंचगंगेची पातळी २८ फुटांवर होती. दिवसभरात त्यात चार फुटांची वाढ होऊन पातळी ३२ फुटांपर्यंत पोहोचल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ७४ मालमत्तांची पडझड होऊन १४ लाख २१ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शेतीकामांवर परिणाम

गेले चार दिवस पाऊस जोरात सुरू असल्याने शेतीची कामे थंडावली आहेत. भांगलण व खतांचा डोस देण्याचे काम खोळंबले आहे.

तालुकानिहाय पाऊस असा-

हातकणंगले (५.७५), शिरोळ ( ३.१४), पन्हाळा (२३.२९), शाहूवाडी (५४.३३), राधानगरी (४७.८३), गगनबावडा (६२.५०), करवीर (१८.२७), कागल (२५.२९), गडहिंग्लज (१४.८५), भुदरगड (४२.८०), आजरा (४४.५५), चंदगड (४९.८३).
 

 

Web Title: Kolhapur: 7500 thousand cubic feet of cow dung disappeared from the milkgong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.