कोल्हापूर : ‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस्’चा ९ टक्के लाभांश, प्रकाश पाटील यांची सर्वसाधारण सभेत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 06:30 PM2018-09-22T18:30:23+5:302018-09-22T18:31:49+5:30
शतकमहोत्सवी राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बॅँकेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी बॅँकेच्या १0१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली. प्रतिभानगर हॉल येथे शनिवारी सकाळी ही सभा पार पडली. संचालक विलास कुरणे यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी विषयवाचन केले.
कोल्हापूर : शतकमहोत्सवी राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बॅँकेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी बॅँकेच्या १0१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली. प्रतिभानगर हॉल येथे शनिवारी सकाळी ही सभा पार पडली. संचालक विलास कुरणे यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी विषयवाचन केले.
प्रास्ताविकात अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले, बॅँकेने १0१ वर्षे पूर्ण केली असून, सलग आठ वर्षे 0 टक्के एनपीए ठेवून १ कोटी ९४ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. हा नफा बॅँकेच्या प्रगतीचे आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. जाहीर करण्यात आलेला लाभांश थेट सभासदांच्या बचत खात्यावर जमा करण्यात येणार आहे. बॅँकेच्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, अहवाल सालात बॅँकेला ‘अ’ वर्ग तसेच रिझर्व्ह बॅँकेचे ‘ग्रेड १’ मानांकन मिळाले आहे. रोख रक्कम तत्काळ मिळण्यासाठी मंजूर तीन एटीएम सेंटर सुरू करीत आहोत. ही सेवा रूपे कार्डद्वारा सभासदांना उपलब्ध आहे.
बॅँकेने उत्तम प्रगती केल्याबद्दल महादेव लांडगे, शांताराम हवालदार, अनिल सरदेसाई, प्रकाश आमते, सी. बी. पोवार, जी. ए. सुनगार, सर्जेराव वारके, वसंत देवकुळे, किरण सणगर, सुभाष मोहिते, संजय चव्हाण, शिवाजी तावडे, बाळासो खडके, प्रल्हाद लव्हटे, दिलीप ठोंबरे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सेवकांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तो टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.
बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांना तिसऱ्यांदा नवी दिल्ली येथे ‘बेस्ट सीईओ’ म्हणून गौरविण्यात आले, त्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शासकीय कर्मचारी आणि सभासदांनी यावेळी अध्यक्ष प्रकाश पाटील आणि उपाध्यक्ष भरत पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सभासदांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
यावेळी संचालक रवींद्र पंदारे, मधुकर पाटील, शशिकांत तिवले, राजेंद्र चव्हाण, अतुल जाधव, राजेंद्र पाटील, रमेश घाटगे, संचालिका हेमा पाटील, नेहा कापरे, संजय सुतार, जयदीप कांबळे, बाळासाहेब घुणकीकर, प्रभारी मुख्य लेखापाल रूपेश पाटोळे आणि कर्मचारी उपस्थित होते.