Kolhapur: तीस हजार रूपयांची लाच स्वीकारताना महिला अव्वल कारकूनास रंगेहात पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:05 PM2024-05-21T21:05:38+5:302024-05-21T21:07:21+5:30
Kolhapur Bribe News: गौण खनिज व्यवसायासाठी शेत जमीन बिगर शेती करून देण्याच्या संदर्भात तीस हजार रूपयांची लाच स्विकारतानां कागल तहसिल कार्यालयातील महसूल विभागातील अव्वल कारकुन अश्विनी अतुल कांरडे (वय 46) रा. लक्षदिप नगर न्यु शाहूपुरी कोल्हापूर यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ पकडले.
कागल (कोल्हापूर) - गौण खनिज व्यवसायासाठी शेत जमीन बिगर शेती करून देण्याच्या संदर्भात तीस हजार रूपयांची लाच स्विकारतानां कागल तहसिल कार्यालयातील महसूल विभागातील अव्वल कारकुन अश्विनी अतुल कांरडे (वय 46) रा. लक्षदिप नगर न्यु शाहूपुरी कोल्हापूर यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ पकडले. ही कारवाई सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास तहसिल कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार व्यक्तीने शेत जमीनीचे बिगर शेती करून देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अश्विनी कारंडे यांनी यासाठी साठ हजार रूपयाची मागणी केली होती. त्या पैकी 30 हजार रूपयांचा पहिला हप्ता आज देण्याचे ठरले होते. पोलीस उपाधिक्षक सरदार नाळे,पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला आदींनी ही कारवाई केली. कारंडे यांना ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.