कोल्हापूर : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी एजंटाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:15 AM2018-05-05T11:15:18+5:302018-05-05T11:15:18+5:30

२५ लाखांच्या खंडणीसाठी कळंबा येथून निगवे खालसा येथील फायनान्स कंपनीच्या एजंटाचे अपहरण करून ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३) गुन्हा दाखल झाला. संशयित विशाल शिंदे (वय ३२), कांबळे, राजा, गणीभाई यांच्यासह आठजणांचा यात समावेश आहे.

Kolhapur: Abduction of Agent for the ransom of Rs. 25 lakhs | कोल्हापूर : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी एजंटाचे अपहरण करून मारहाण

कोल्हापूर : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी एजंटाचे अपहरण करून मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्दे पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी एजंटाचे अपहरण करून मारहाणमारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : कळंबा येथून निगवे खालसा येथील फायनान्स कंपनीच्या एजंटाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३) गुन्हा दाखल झाला. संशयित विशाल शिंदे (वय ३२), कांबळे, राजा, गणीभाई यांच्यासह आठजणांचा यात समावेश आहे.

अधिक माहिती अशी, विजय निवृत्ती कांबळे (३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बॅँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्यांतील कर्ज मिळवून देण्यासाठी लोकांना मदत करतात. या माध्यमातून त्यांना कमिशन मिळते.

गुरुवारी (दि. ३) त्यांना विशाल शिंदे याने फोन करून कळंबा येथील साई मंदिरासमोर बोलावून घेतले.  येथील मंगल कार्यालयासमोर लावलेल्या कारमध्ये आठजणांनी जबरदस्तीने त्यांना बसविले.

तेथून पाचगाव, आर. के.नगर, विद्यापीठ, चित्रनगरी, गोकुळ शिरगाव, फाईव्ह स्टार एमआयडीसी या मार्गावरून नेऊन स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण केली. शिंदे याने तू, कर्ज प्रकरणामध्ये भरपूर पैसे मिळविले आहेस. आता आम्हाला २५ लाख रुपये दे, नाहीतर तुला ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची धमकी दिली.

त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या खिशातील साडेचार हजार, एटीएम कार्डवरून चार हजार व मित्र बाबासाहेब कांबळे यांचेकडून सायबर चौक येथे अनोळखी व्यक्तीकडून ७२ हजार असे सुमारे ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. भयभीत झालेल्या विजय कांबळे यांनी याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Abduction of Agent for the ransom of Rs. 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.