कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ३० अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:35 AM2018-05-19T11:35:31+5:302018-05-19T11:35:31+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनधिकृत नळ कनेक्शन शोधपथकाने शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणची ३० अनधिकृत पाणी कनेक्शन बंद केली. शाहूनगर, दौलतनगर, एस. टी. स्टँड, स्टेशन रोड, शाहूपुरी, कारंडे मळा, अहिल्याबाई होळकर नगर, धनगरवाडा, प्रतिराज गार्डन, गंगाई लॉन, डाकवे गल्ली, जासूद गल्ली, गोखले कॉलेज परिसर, मस्कुती तलाव, गवत मंडई, उत्तरेश्वर, चांभार गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत झालेल्या कारवाईत एकूण ४३४ अनधिकृत पाणी कनेक्शन बंद करण्यात आली आहेत.

Kolhapur: Action on 30 unauthorized ports connection of corporation | कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ३० अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ३० अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई

Next
ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेच्या ३० अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाईएकूण ४३४ अनधिकृत पाणी कनेक्शन बंद

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अनधिकृत नळ कनेक्शन शोधपथकाने शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणची ३० अनधिकृत पाणी कनेक्शन बंद केली. शाहूनगर, दौलतनगर, एस. टी. स्टँड, स्टेशन रोड, शाहूपुरी, कारंडे मळा, अहिल्याबाई होळकर नगर, धनगरवाडा, प्रतिराज गार्डन, गंगाई लॉन, डाकवे गल्ली, जासूद गल्ली, गोखले कॉलेज परिसर, मस्कुती तलाव, गवत मंडई, उत्तरेश्वर, चांभार गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत झालेल्या कारवाईत एकूण ४३४ अनधिकृत पाणी कनेक्शन बंद करण्यात आली आहेत.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम राबविण्यासाठी पाच पथके नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत शहरातील विविध ठिकाणी अचानक भेटी देऊन अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई जलअभियंता सुरेश कुलकर्णी व पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या नियंत्रणाखाली पथक प्रमुख मोहन जाधव, के. टी. पाटील, संजय पाटील, भिकू कांबळे, रणजित संकपाळ, अमर बागल, पी. एस. माने, उदय पाटील, मीटर रिडर पृथ्वीराज चव्हाण, किरण सणगर, रमेश देसाई, उमेश साळोखे, महावीर आवळे, उदय भोसले यांनी केली.
 

 

Web Title: Kolhapur: Action on 30 unauthorized ports connection of corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.