कोल्हापूर :अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तालुक्यातच करू : आडसूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 11:12 AM2018-12-31T11:12:19+5:302018-12-31T11:13:29+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ज्या त्या तालुक्यातच करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आडसूळ यांची भेट घेऊन अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ज्या त्या तालुक्यातच करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली.
प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आडसूळ यांची भेट घेऊन अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
प्राथमिक शाळेतील मुलांची संख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यांचे समायोजन दुर्गम तालुक्यात करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने काढले आहेत. याबाबत शिष्टमंडळाने आडसूळ यांची भेट घेतली. अतिरिक्त शिक्षकांचे त्याच तालुक्यात समायोजन करण्याची ग्वाही आडसूळ यांनी दिली.
शिष्टमंडळात संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, सरचिटणीस उत्तम सुतार, कार्याध्यक्ष वसंत जाधव, शिक्षक बॅँकेचे अध्यक्ष साहेब शेख, राजमोहन पाटील, अरुण पाटील, बजरंग लगारे, बाजीराव कांबळे, जी. एस. पाटील, प्रशांत पोतदार, दिलीप पाटील, संजय पाटील, अमोल जाधव, आदी उपस्थित होते.