कोल्हापूर : आयटीआय आॅनलाईन प्रवेश ३० जूनपर्यंत, ११ आॅगस्टपर्यंत चार फेऱ्यांत प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:18 AM2018-06-19T11:18:03+5:302018-06-19T11:18:03+5:30

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ३० जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यात येणार आहे. एक जूनपासून अर्ज भरणे सुरू असून आज अखेर ४५१ जणांनी अर्जांची निश्चित केली आहे.

Kolhapur: Admission Process in four rounds of ITI online admission till June 30, 11th August | कोल्हापूर : आयटीआय आॅनलाईन प्रवेश ३० जूनपर्यंत, ११ आॅगस्टपर्यंत चार फेऱ्यांत प्रवेश प्रक्रिया

कोल्हापूर : आयटीआय आॅनलाईन प्रवेश ३० जूनपर्यंत, ११ आॅगस्टपर्यंत चार फेऱ्यांत प्रवेश प्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्दे आयटीआय आॅनलाईन प्रवेश ३० जूनपर्यंतचार फेऱ्यांत प्रवेश प्रक्रिया; ११ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार प्रक्रिया

कोल्हापूर : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ३० जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यात येणार आहे. एक जूनपासून अर्ज भरणे सुरू असून आज अखेर ४५१ जणांनी अर्जांची निश्चित केली आहे.

कोल्हापूर शासकीय आयटीआयमध्ये ३१ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या १३९९ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ३० जूनपर्यंत सकाळी १० ते ११ यावेळेत मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर शासकीय आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

 

  1. आॅनलाईन प्रवेश अर्ज भरणे - ३० जूनपर्यंत
  2. प्रवेश अर्ज निश्चित करणे - २ जुलैपर्यंत
  3. पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे - ३ जुलै
  4. प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर - ५ जुलै
  5. गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे - ५ ते ६ जुलै
  6. अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करणे - १० जुलै
  7. पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही करणे - ११ ते १५ जुलै
  8. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी आॅनलाईन विकल्प सादर करणे - ११ ते १६ जुलै
  9. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्रवेश प्रत्यक्ष कार्यवाही करणे - २१ ते २५ जुलै
  10. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी आॅनलाईन विकल्प सादर करणे - २१ ते २५ जुलै
  11. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही करणे - ३१ जुलै ते ३ आॅगस्ट
  12. चौथ्या प्रवेश फेरीसाठी आॅनलाईन विकल्प सादर करणे - ३१ जुलै ते ४ आॅगस्ट
  13. चौथ्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही करणे - ८ ते ११ आॅगस्ट
  14. नव्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज करणे व निश्चित करणे - २५ जुलै ते ११ आॅगस्ट
  15. समुपदेशन फेरी - १३ आॅगस्ट
  16. खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेश - २ जुलै ते ३१ आॅगस्ट

 

 

Web Title: Kolhapur: Admission Process in four rounds of ITI online admission till June 30, 11th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.