कोल्हापूर: वडिलांचे अंत्यसंस्कार करुन विश्वजीत पोहोचला बारावीच्या परीक्षेला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:32 PM2023-02-22T12:32:18+5:302023-02-22T12:34:21+5:30

चरण ( ता. शाहूवाडी) संभाजी शामराव शिसाळ यांचे मंगळवार दि. २१ रोजी सकाळी निधन झाले. त्यांचा मुलगा विश्वजीत बारावी मध्ये शिक्षण असून, वडिलांच्यावर अंत्यसंस्कार करून त्याने दिला बारावीचा पेपर.

Kolhapur After his father's last rites, Vishwajit reached the 12th examination | कोल्हापूर: वडिलांचे अंत्यसंस्कार करुन विश्वजीत पोहोचला बारावीच्या परीक्षेला

कोल्हापूर: वडिलांचे अंत्यसंस्कार करुन विश्वजीत पोहोचला बारावीच्या परीक्षेला

googlenewsNext

बांबवडे :(आर डी पाटील) -  चरण (ता. शाहूवाडी) येथील संभाजी शिसाळ हे शिराळा येथे भूमी अभिलेख अधीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून, त्यातील विश्वजीत हा मुलगा समाज विकास विद्यालय सागाव येथे बारावी विज्ञान या शाखेतून शिक्षण घेत आहे. बारावीचे वर्ष अंतिम टप्प्यात असताना वडील आजारी पडले. वडिलांची सुश्रुषा करत तो बारावीचा अभ्यास करत होता. आणि बारावीच्या पहिल्या पेपर दिवशी  सकाळी विश्वजीतच्या वडिलांचे निधन झाले.

कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नातेवाईक व शेजारी यांनी विश्वजीतला बारावीचा पेपर देण्यात काही अडथळा येऊ नये म्हणून, संभाजी  यांचा अंत्यसंस्कार लवकर उरकून घेतला व विश्वजीतला  चिखली तालुका शिराळा येथे केंद्रावर परीक्षेसाठी घेऊन गेले. वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून विश्वजीतने जड अंतकरणाने बारावीचा पहिला पेपर दिला.

Web Title: Kolhapur After his father's last rites, Vishwajit reached the 12th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.