कोल्हापूर : स्कूल बसपाठोपाठ रिक्षांवरही कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:21 PM2018-06-29T18:21:48+5:302018-06-29T18:25:10+5:30
प्रत्येक पालकाच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विद्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र, काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जिवाशीच खेळ करीत आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिले आहेत. त्यामुळे स्कूल बसेस पाठोपाठ रिक्षाचालकही ‘आरटीओ’च्या टेहळणीवर आले आहेत.
कोल्हापूर : प्रत्येक पालकाच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विद्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र, काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जिवाशीच खेळ करीत आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिले आहेत. त्यामुळे स्कूल बसेस पाठोपाठ रिक्षाचालकही ‘आरटीओ’च्या टेहळणीवर आले आहेत.
चोकाक येथील स्कूल बसच्या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यात रस्त्यांची दुरवस्था, क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची ने-आण, वाहतुकीच्या नियमांचे राजरोसपणे होणारे उल्लंघन आणि वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून होणारे दुर्लक्ष यांमुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची सुरक्षितता टांगणीला लागली आहे. यात पालकांचीही भूमिका स्वस्तात सोय होते म्हणून असे शार्टकटचे मार्ग शोधण्याची आहे.
का रिक्षात नियमित प्रवाशांपेक्षा दीडपट म्हणजेच १० छोट्या विद्यार्थ्यांना रिक्षातून ने-आण करण्याची मुभा आहे. मात्र, काही रिक्षाचालक १६, कधी २० असे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. विशेष म्हणजे या दाटीवाटीच्या प्रवासातही या रिक्षाचालकांचे, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे नाते जोडलेले असते. नियमानुसार विद्यार्थी घेतल्यास रिक्षाचालकांनीही आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
या सर्व बाबी व्यावहारिक दृष्ट्या बरोबर असल्या तरी अपघात काही सांगून घडत नाहीत; त्यामुळे आपल्या पाल्यांचा असा जीवघेणा प्रवास टाळणे पालकांच्या हातात आहे. अशा अवैध वाहतुकीविरोधात नियमानुसार कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही कारवाईचे संकेत दिले आहेत.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वर्षभरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून झालेली कारवाई अशी,
तपासलेली वाहने दोषी वाहने निकाली प्रकरण तडजोड शुल्क
१०५ २४ २१ ४२,६००