कोल्हापूर : चर्चेच्या गुऱ्हाळानंतर अखेर बाजार समितीतील गूळ सौदे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 07:14 PM2021-11-15T19:14:14+5:302021-11-15T19:19:56+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये एक किलो गूळ बॉक्सच्या वजनावरुन सोमवारी खरेदीदारांना सौदे बंद पाडले. ...
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये एक किलो गूळ बॉक्सच्या वजनावरुन सोमवारी खरेदीदारांना सौदे बंद पाडले. तब्बल अडीच तास चर्चेचे गुऱ्हाळ सुरु राहिले. त्यानंतर बॉक्ससह शेतकऱ्यांना १८ किलो ३५० ग्रॅम वजन देण्यावर खरेदीदारांनी एकमत केले. सततच्या सौदे बंद मुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते.
समितीमध्ये एक किलो गुळाच्या वजनावरुन एक महिन्यापुर्वी खरेदीदार व शेतकऱ्यांमध्ये वाद उफाळला होता. त्यावेळी एका बॉक्सचे वजन १८ किलो ५०० ग्रॅम धरुन त्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते. त्यानुसार समितीने परिपत्रकही संबधितांना लागू केले होते. मात्र खरेदीदारांनी पुन्हा ठरल्यानुसार वजन देण्यास नकार दिल्याने सोमवारी सौदे बंद पडले. त्यानंतर अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला.