कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेची १७ जुलैपासून पुन्हा सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:39+5:302021-07-07T04:30:39+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित असणारी कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावरील विमानसेवा दि. १७ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. आठवड्यातील ...

Kolhapur-Ahmedabad flight resumes from July 17 | कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेची १७ जुलैपासून पुन्हा सुरुवात

कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेची १७ जुलैपासून पुन्हा सुरुवात

Next

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित असणारी कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावरील विमानसेवा दि. १७ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. आठवड्यातील मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी ही सेवा असणार आहे. त्यामुळे अहमदाबाद, राजकोटला जाणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा संपणार आहे.

कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावरील सेवा दि. २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली. या मार्गावरील विमानसेवेला कोल्हापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या मार्गावरील सेवा स्थगित करण्यात आली. हा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. त्यानुसार दि. १७ जुलैपासून संबंधित सेवा पुन्हा सुरू होणार आहे. सध्या मुंबई-कोल्हापूर-मुंबई, हैदराबाद-कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावरील सेवा नियमितपणे सुरू आहेत. दरम्यान, कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा पूर्ववत सुरू होत असल्याचा आनंद आहे. कोल्हापूरमधून अहमदाबाद, राजकोट, सुरतला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात कापडासह अन्य व्यापारी, व्यावसायिकांचा समावेश आहे. गुजरातमधील पर्यटनक्षेत्रही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर-तिरुपती मार्गावरील विमानसेवा देखील लवकर सुरू होईल, असे पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी मंगळवारी सांंगितले.

पॉंईंटर

कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेची वेळ

विमान अहमदाबाद येथून निघणार : सकाळी ७ वाजून ५० मिनिटे

कोल्हापूरला पोहोचणार : सकाळी १० वाजून १० मिनिटे

कोल्हापूरहून विमान निघणार : सकाळी १० वाजून ३० मिनिटे

अहमदाबाद येथे पोहोचणार : दुपारी १२ वाजून ५० मिनिटे

Web Title: Kolhapur-Ahmedabad flight resumes from July 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.