पावसातही कोल्हापूरची विमानसेवा सुरळीतपणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:23 PM2019-08-02T15:23:09+5:302019-08-02T15:25:09+5:30
कोल्हापूर : पावसाची संततधार सुरू असली, तरी सिग्नल योग्य पद्धतीने मिळत असल्याने कोल्हापूरची विमानसेवा सुरळीतपणे सुरू आहे. प्रवाशांची संख्याही ...
कोल्हापूर : पावसाची संततधार सुरू असली, तरी सिग्नल योग्य पद्धतीने मिळत असल्याने कोल्हापूरचीविमानसेवा सुरळीतपणे सुरू आहे. प्रवाशांची संख्याही कायम असल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमध्ये संततधारपणे पाऊस सुरू आहे. त्याचा विविध घटकांवर परिणाम झाला आहे. मात्र, विमानसेवा सुरळीतपणे सुरू आहे. जोरात पाऊस असला, तरी विमानसेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक असणारे सिग्नल योग्य पद्धतीने मिळत आहेत. त्यामुळे हैदराबाद-कोल्हापूर-तिरूपती आणि हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवरील विमानसेवा विनाअडथळा सुरू आहे. या मार्गावरील प्रवाशांची संख्या गेल्या दोन महिन्यांप्रमाणे आहे. हवामान स्वच्छ आणि योग्य असल्याची खात्री करूनच विमानसेवा सुरू ठेवली जात असल्याचे कटारिया यांनी सांगितले.
दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६४ एकर भूसंपादनाची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला सादर झाला आहे. प्रशासनाकडून राज्य शासनाला सादर करावयाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.