कोल्हापूर : अंबाबाई तिर्थक्षेत्र आराखडाची निवीदा नवरात्रोत्सवानंतरच : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 03:38 PM2018-10-06T15:38:54+5:302018-10-06T15:42:37+5:30
नवरात्रोत्सवानंतर श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कोल्हापूर : नवरात्रोत्सवानंतर श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत राज्य शासकडून महापालिकेस आवश्यक निधी प्राप्त झालेला आहे. विकास आराखड्यातील दिसून आलेल्या त्रूटीबाबत अनेकवेळा मंथन झाले आहे. आता आवश्यक सुचनांची अंमलबजावणी करत त्रूटी दूर करुन करण्यात येणार आहेत.
त्याबाबत लागणाऱ्या आवश्यक सर्व मंजूरींचे सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आले आहे. पण गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सणामुळे या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत प्रक्रिया थांबली आहे.
नवरात्रोत्सवानंतर लवकरच तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल, त्यानंतर निवीदा मंजूरीच्या प्रक्रियेनंतर तातडीने कार्यवाहीही सुरु केली जाईल, तशा सुचना महापालिकेस दिल्याची अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.