कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:11 PM2017-08-31T18:11:16+5:302017-08-31T18:14:26+5:30

कोल्हापूर : बालविकास आणि आईसीडीएस योजनेअंतर्गत संबंधित विभागात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल गुरुवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण यांचा समावेश आहे. त्यांचा केंद्रीय महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री श्रीमती मनेका संजय गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 Kolhapur Anganwadi Sevika Chandrakal Chavan National Award is honored | कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Next
ठळक मुद्देमनेका गांधी यांच्या हस्ते सन्मानअंगणवाडी सेविकांना प्रशिक्षणाचा व्यापक कार्यक्रम २५,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र २0१६-१७ मधील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

कोल्हापूर : बालविकास आणि आईसीडीएस योजनेअंतर्गत संबंधित विभागात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल गुरुवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण यांचा समावेश आहे. त्यांचा केंद्रीय महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री श्रीमती मनेका संजय गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चंद्रकला चव्हाण यांच्याशिवाय राज्यातील चंद्रकला झुरमुरे (चंद्रपूर) आणि लताबाई वांईगडे (परभणी) या अंगणवाडी सेविकांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मनेका गांधी यांच्या हस्ते नवी दिल्लीत बाल विकास आणि आयसीडीएस योजनेअंतर्गत संबंधित विभागातील अंगणवाडी सेविकांच्या २0१६-१७ मधील उल्लेखनीय सेवेसाठी हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. यामध्ये ५१ अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात.

याप्रसंगी मनेका गांधी यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांच्यापुढे लहान मुलांचा विकास, समाजाला एकत्रित करणे आणि जनजागृती करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा आग्रह धरला. त्या म्हणाल्या, की अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या सहाय्यक मुलांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावू शकतात, कारण देशभरात या अग्रक्रमाने पुढे असलेल्या कार्यकर्त्यांवर लहान मुलांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली आहे.

देशात आता १४ लाख अंगणवाडी केंद्रात जवळजवळ २७ लाख अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक कार्यरत आहेत. तत्पूर्वी महिला आणि बाल विकास खात्याच्या राज्यमंत्री कृष्णा राज आणि महिला आणि बाल विकास खात्याचे सचिव राकेश श्रीवास्तव यांनीही अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराअंतर्गत २५,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते. राज्य स्तरावरील पुरस्कारांतर्गत ५000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते. २000-२00१पासून हे पुरस्कार देण्यात येतात.

Web Title:  Kolhapur Anganwadi Sevika Chandrakal Chavan National Award is honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.