कोल्हापूर : बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:19 PM2018-04-23T19:19:40+5:302018-04-23T19:19:40+5:30

बिग हिरो ६ या बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्ताने अनेक संस्था, मान्यवरांनी चिल्लर पार्टीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नाट्यकर्मी प्रकाश पाटील यांनी चिल्लर पार्टीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

Kolhapur: Anniversary of the Chillar Party by the performance of the children's film | कोल्हापूर : बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा वर्धापनदिन

कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालक संवेदना मंचतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुमेधा कुलकर्णी, शीतल राईलकर, अभिनेते प्रकाश पाटील, अभय बकरे, रविंद्र शिंदे, उदय संकपाळ , सचीन पाटील उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा वर्धापनदिनशुभेच्छांचा वर्षाव : अभिनेते प्रकाश पाटील यांनी केले कौतुक

कोल्हापूर : बिग हिरो ६ या बालचित्रपटाच्या प्रदर्शनाने चिल्लर पार्टीचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्ताने अनेक संस्था, मान्यवरांनी चिल्लर पार्टीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नाट्यकर्मी प्रकाश पाटील यांनी चिल्लर पार्टीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी जगभरातील चित्रपट पहायला मिळावेत या हेतूने सहा वर्षापूर्वी शिवाजी मराठा हायस्कूल येथे चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीला प्रारंभ झाला. गेल्या सहा वर्षात अनेक बालचित्रपट शाहू स्मारक भवन येथे दाखविण्यात आले. चिल्लर पार्टीच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर कलाकारांनी उपस्थिती लावली. आता चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे काम कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही सुरु झाले आहे.

कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे शाहू स्मारक भवन येथे आयोजित बालचित्रपटाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बिग ६ हा बालचित्रपट चिल्लर पार्टीच्या विद्यार्थी चळवळीमार्फत येथील शाहू स्मारक भवन येथे दाखविण्यात आला. सुधाकर जोशी झोपडपट्टीतील वंचित घटकातील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याशिवाय पालक संवेदना मंचच्या सुमेधा कुलकर्णी आणि शीतल राईलकर यांनी चिल्लर पार्टीला मंचतर्फे शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालक संवेदना मंचतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुमेधा कुलकर्णी, शीतल राईलकर, अभिनेते प्रकाश पाटील, अभय बकरे, रविंद्र शिंदे, उदय संकपाळ , सचीन पाटील उपस्थित होते.

कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालक संवेदना मंचतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुमेधा कुलकर्णी, शीतल राईलकर, अभिनेते प्रकाश पाटील, अभय बकरे, रविंद्र शिंदे, उदय संकपाळ , सचीन पाटील उपस्थित होते.
कोल्हापूरात चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालक संवेदना मंचतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुमेधा कुलकर्णी, शीतल राईलकर, अभिनेते प्रकाश पाटील, अभय बकरे, रविंद्र शिंदे, उदय संकपाळ , सचीन पाटील उपस्थित होते.

चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सहाव्या वर्धापनदिनी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश पाटील यांनी केक कापून चिल्लर पार्टीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, शिवा काशिद हे माझ्या अभिनय क्षेत्रातील गुरु आहेत. छत्रपती शिवरायांसारखे हुबेहुब वेशांतर करुन त्यानंी शिवरायांना शत्रूच्या तावडीतून सुटण्यास मदत केली. त्यांच्या अप्रतिम अभिनयाला तोड नव्हती. मी त्यांना माझा गुरु मानतो. मुलांनीही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.

यावेळी चिल्लर पार्टीचे चंद्रशेखर तुदिगाल, ओंकार कांबळे, नसीम यादव , विश्व शिंदे, रोशन जोशी, सिध्दिकिरण नलावडे, युवराज देशमुख, मल्हार कोपार्डेकर, अर्शद महालकरी, अनुजा बकरे, साक्षी संकपाळ, देविका बकरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

Web Title: Kolhapur: Anniversary of the Chillar Party by the performance of the children's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.